Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

ग्राहकांनो.. Hyundai Alcazar सह खरेदी करा ‘ह्या’ शानदार कार्स, मिळते 1 लाखांची सूट; पहा संपूर्ण लिस्ट

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या Hyundai जुलै २०२३ मध्ये Grand i10 Nios सह Aura, i20, i20 N Line, Alcazar आणि Kona EV सारख्या लोकप्रिय कार्सवर बंपर सूट देत आहे.

0

Hyundai Cars Discount Offers: जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी जाणून घ्या जुलै 2023 मध्ये Hyundai तिच्या काही लोकप्रिय कार्सवर बंपर डिस्काउंट देत आहे.

ज्याच्या तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी आता परवडणाऱ्या किमतीमध्ये नवीन कार घरी आणू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या Hyundai जुलै 2023 मध्ये Grand i10 Nios सह Aura, i20, i20 N Line, Alcazar आणि Kona EV सारख्या लोकप्रिय कार्सवर बंपर सूट देत आहे. चला मग जाणून घेऊया तुम्ही कोणत्या कार्सवर किती डिस्काउंट प्राप्त करू शकतात.

Hyundai Kona EV वर 1 लाखांची सूट

Hyundai या महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यात Kona इलेक्ट्रिक कारवर 1 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. यात 39.2kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतो, जो 136hp आणि इलेक्ट्रिक मोटरचे 395Nm आउटपुट जनरेट करतो. त्याची किंमत 23.84 लाख ते 24.03 लाख रुपये आहे.

Grand i10 Nios वर 38 हजारांची सूट

कंपनी या महिन्यात Grand i10 Nios वर एकूण 38,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. 25,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, 10,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त एक्सचेंज सूट आणि 3,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट आहे. या कारची किंमत 5.73 लाख रुपयांपासून ते 8.51 लाख रुपयांपर्यंत आहे.

Hyundai Aura

Hyundai ने या महिन्यात Aura वर Rs 33,000 पर्यंत सूट जाहीर केली आहे. यामध्ये 20,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, 10,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त एक्सचेंज सूट आणि 3,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. या कारची किंमत 6.33 लाख ते 8.90 लाख रुपये आहे.

Hyundai Alcazar

या महिन्यात Hyundai Alcazar च्या खरेदीवर 20,000 रुपयांपर्यंतच्या सूटचा लाभ दिला जात आहे. यावर फक्त 20,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त एक्स्चेंज सूट दिली जात आहे. या SUV ची किंमत 16.78 लाख ते 21.13 लाख रुपये आहे.