Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Alcazar Waiting Period : सणासुदीच्या तोंडावर लोकप्रिय SUV Alcazar कारचा प्रतीक्षा कालावधी झाला कमी, पहा वैशिष्ट्ये आणि किंमत

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या Alcazar एसयूव्ही कारच्या प्रतीक्षा कालावधीमध्ये घट करण्यात आली आहे. तसेच लवकरच या कारचे फेसलिफ्ट मॉडेल बाजारात दाखल होणार आहे.

0

Hyundai Alcazar Waiting Period : ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या ग्राहकांना सणासुदीच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी दिली आहे. ह्युंदाई मोटर्सने त्यांच्या लोकप्रिय Alcazar चा प्रतीक्षा कालावधी कमी केला आहे. त्यामुळे कमी दिवसांमध्ये तुम्ही Alcazar SUV कार घरी आणू शकता.

ह्युंदाई मोटर्सने या महिन्यात अल्काझारच्या प्रतीक्षा कालावधीमध्ये मोठी घट झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अल्काझार एसयूव्ही कार खरेदी करण्याची तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे. कमी दिवसांमध्ये शानदार फीचर्स कार तुम्ही घरी आणू शकता.

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या अल्काझार एसयूव्ही कारचा प्रतीक्षा कालावधी 22 आठवडे सांगण्यात आला होता. मात्र आता प्रतीक्षा कालावधी ८ आठवड्यांनी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे अल्काझार एसयूव्ही कार खरेदीसाठी तुम्हाला आता १४ आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागू शकते.

Hyundai Alcazar प्रतीक्षा कालावधी

ह्युंदाई मोटर्सच्या अल्काझार एसयूव्ही कारच्या 1.5-लिटर टर्बो-पेट्रोल सिग्नेचर (O) 6S AT SE, 1.5-लीटर डिझेल प्लॅटिनम 7S AT आणि 1.5-लिटर डिझेल सिग्नेचर (O) AT 7S व्हेरियनसाठी तुम्हाला 8 आठवडे प्रतीक्षा करावी लागू शकते.

1.5-लिटर डिझेल प्रेस्टिज (O) 7S AT व्हेरियंटसाठी 2 आठवडे आणि इतर व्हेरियंटसाठी 4 ते 6 आठवडे प्रतीक्षा करावी लागू शकते. अल्काझार एसयूव्ही कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 16.77 लाख रुपये आहे.

Hyundai Alcazar वैशिष्ट्ये

ह्युंदाई Alcazar एसयूव्ही कारमध्ये प्रिमीयम लक्झरी फीचर्स देण्यात आले आहेत. कारमध्ये कॅस्केडिंग ग्रिल, ऑल-राउंडर क्लॅडिंग, रॅप-अराउंड टेल लॅम्प, 18-इंच अलॉय व्हील्स उपलब्ध आहेत.

तसेच कारमध्ये 10.25-इंच टचस्क्रीन, 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटर, वायरलेस चार्जिंग, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, पॅनोरॅमिक सनरूफ, 64-कलर अॅम्बियंट लाइटिंग, 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

नवीन अल्काझार पुढील वर्षी सुरू होईल

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या अल्काझार एसयूव्ही कारचे नवीन Adventure Edition या वर्षी ऑगस्टमध्ये लॉन्च केले होते. ही कार नवीन वन ग्रीन कलरमध्ये सादर करण्यात आली आहे. लाल ब्रेक कॅलिपर्ससह काळ्या रंगाची अलॉय व्हील आणि फ्रंट फेंडरवर अॅडव्हेंचर बॅजिंग कारमध्ये देण्यात आले आहे. अल्काझार फेसलिफ्ट पुढील वर्षी लॉन्च करण्यात येणार आहे.