Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Aura Discount Offer : अशी संधी पुन्हा नाही! ताबडतोब खरेदी करा 28 kmpl मायलेज देणारी ह्युंदाईची ही कार! मिळतेय हजारोंची सूट

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या कारवर ३१ ऑक्टोबरपर्यंत मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे ह्युंदाईच्या कार खरेदी करून तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता.

0

Hyundai Aura Discount Offer : ह्युंदाई मोटर्सकडून भारतीय ऑटो क्षेत्रात त्यांचा विस्तार वाढवण्यासाठी अनेक नवीन कार सादर करत आहे. तसेच सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कारकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठी सूट देत आहे.

तुम्हालाही तुमच्या फॅमिलीसाठी उत्तम ५ सीटर सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी ह्युंदाईची ऑरा सीएनजी कार बेस्ट पर्याय आहे. ही कार सर्वोत्तम मायलेज देण्यास सक्षम आहे.

जर तुम्ही ह्युंदाई मोटर्सची ऑरा सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर याच महिन्यात करा. कारण ह्युंदाईकडून ऑरा कारवर मोठी ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता.

ह्युंदाई मोटर्स त्यांच्या कारवर ३१ ऑक्टोबरपर्यंत सूट देत आहे. त्यामुळे तुम्ही देखील नवीन कार खरेदी करून संधीचा फायदा घेऊ शकता. तुम्हाला ह्युंदाई मोटर्सच्या कार ऑफरबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही जवळच्या डिलरशिपला भेट देऊ शकता.

ऑफर काय आहे?

ह्युंदाई मोटर्स त्यांच्या Aura सीएनजी सेडान कारवर 20,000 रुपयांची रोख सूट देत आहे. तसेच 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील देत आहे. त्यामुळे तुम्ही या संधीचा फायदा घेऊन हजारो रुपयांची बचत करू शकता.

ह्युंदाई मोटर्सच्या Aura पेट्रोल व्हेरियंट कारवर देखील ऑफर करण्यात येत आहे. कारच्या पेट्रोल व्हेरियंटवर 10,000 रुपयांची रोख सूट आणि 3,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे.

ऑरा इंजिन

ऑरा कारमध्ये 1197 सीसी पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ह्युंदाईने त्यांच्या ऑरा कारमध्ये सीएनजी पर्याय देखील ऑफर केलं आहे. ही कार सीएनजी व्हेरियंटमध्ये 28 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

किंमती 11,200 रुपयांपर्यंत वाढल्या

ह्युंदाई मोटर्सने त्यांच्या Aura या लोकप्रिय सेडान कारच्या किमती 11,200 रुपयांनी वाढवल्या आहेत. ऑरा कारच्या E व्हेरियंतची किंमत अधिक वाढवण्यात आली होती. Aura च्या SX व्हेरियंटच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. बाकी सर्व व्हेरियंटमध्ये 9,900 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.