Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Cars Discount Offer : अशी संधी पुन्हा नाही! ह्युंदाई कार्सवर मिळतोय 3 लाखांपर्यंत बंपर डिस्काउंट, त्वरित घ्या लाभ

0

Hyundai Cars Discount Offer : नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या अनेक कारवर महिन्यात आकर्षक ३ लाखांची मोठी सूट दिली जात आहे.

ह्युंदाई मोटर्स त्यांच्या लोकप्रिय कारवर या महिन्यात इयर एंड ऑफर देत आहे. त्यामुळे या महिन्यात तुम्ही ह्युंदाईची कार खरेदी करून लाखोंची बचत करू शकता. ही ऑफर ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंतच दिली जाणार आहे.

ह्युंदाई मोटर्सकडून देण्यात येत असलेल्या ऑफरमध्ये Grand i10, Alcazar 7-सीटर SUV आणि Tucson सारख्या कारचा समावेश आहे. या कार खरेदी करून तुम्ही देखील या महिन्यात 3 लाखांपर्यंत बंपर बचत करू शकता.

Grand i10 डिस्काउंट ऑफर

ह्युंदाई मोटर्स त्यांच्या Grand i10 कारवर देखील या महिन्यात आकर्षक सूट देत आहे. Grand i10 कारवर कंपनीकडून 48 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. यामध्ये 35,000 रुपयांची कॅश डिस्काउंट आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. तसेच कारच्या सीएनजी मॉडेलवर 33,000 रुपयांची सूट दिली जात आहे.

ह्युंदाई i20 आणि i20 N-Line डिस्काउंट ऑफर

ह्युंदाई मोटर्स त्यांच्या i20 आणि i20 N-Line या दोन कारवर देखील आकर्षक सूट देत आहे. त्यामुळे या महिन्यात तुम्ही या कार खरेदी करून हजारोंची बचत करू शकता. कारवर 50,000 रुपयांची मोठी सूट दिली जात आहे. Sportz MT व्हेरियंटवर 35,000 हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

Alcazar 7-सीटर SUV वर डिस्काउंट ऑफर

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या Alcazar ७ सीटर कारवर देखील ग्राहकांना मोठी सूट दिली जात आहे. तुम्हीही या कारचे पेट्रोल व्हेरियंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी 35,000 रुपयांची सूट दिली जात आहे. Alcazar च्या डिझेल व्हेरियंटवर 20,000 एक्सचेंज बोनस दिला जात आहे.

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या Tucson एसयूव्हीच्या डिझेल कारवर 1.5 लाख रुपयांची सूट दिली जात आहे. त्यामुळे Tucson एसयूव्ही कार खरेदी करून तुम्ही 1.5 लाखांची बचत करू शकता. तसेच ह्युंदाई मोटर्स त्यांच्या Kona EV कारवर सर्वात मोठी 3 लाखांची सूट देत आहे.