Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Cars Discount : कार खरेदीवर पैसे बचतीची संधी ! ह्युंदाई मोटर्सच्या या लोकप्रिय कारवर मिळतेय हजारोंची मोठी सूट, पहा कारची यादी

कार खरेदीवर पैशांची बचत करायची असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण ह्युंदाई मोटर्स त्यांच्या अनेक कारवर मोठी सूट देत आहे.

0

Hyundai Cars Discount : ह्युंदाई मोटर्सकडून सणासुदीच्या काळात त्यांच्या कारवर ग्राहकांना मोठी सूट देण्यात येत आहे. त्यामुळे ३१ ऑक्टोबरपर्यंत ह्युंदाई मोटर्सच्या कार खरेदी करून तुम्ही मोठी पैशांची बचत करू शकता. तसेच कमी बजेटमध्ये शानदार कार खरेदी करण्याची देखील संधी आहे.

ह्युंदाई मोटर्स त्यांच्या i20 N Line, Alcazar, Verna आणि इतर अनेक कारवर 50,000 रुपयांपर्यंतचे फायदे देता आहे. त्यामुळे ह्युंदाई मोटर्सच्या या कार खरेदी करून पैशांची मोठी बचत करू शकता.

Hyundai i20 N लाइन

ह्युंदाई मोटर्सने अलीकडेच i20 N लाइन कारचे फेसलिफ्ट मॉडेल सादर केले आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारच्या प्री-फेसलिफ्ट मॉडेलवर ह्युंदाईकडून 50,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. तुम्हीही ही कार खरेदी करून ५० हजार रुपयांची बचत करू शकता. या कारमध्ये 1.0-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 120 hp पॉवर आणि 172 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होते.

Hyundai Grand i10 Nios

ह्युंदाई Grand i10 Nios खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा महिना खास आहे. कारण या कारवर कंपनीकडून 43000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या कारमध्ये 1.2-लिटर, चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

हे इंजिन 83hp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा AMT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या कारमध्ये सीएनजी पर्याय देखील देण्यात आला आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5.84 लाख रुपये आहे.

ह्युंदाई ऑरा

ह्युंदाई ऑरा कारवर कंपनीकडून ३१ ऑक्टोबरपर्यंत ग्राहकांना मोठी सूट दिली जात आहे. या कारमध्ये अनेक शानदार वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कारची एक्स शोरूम किंमत 6.43 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारवर कंपनीकडून 33000 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे.

ह्युंदाई Verna

ह्युंदाई Verna ही सर्वाधिक लोकप्रिय सेडान कार आहे. या कारमध्ये अनेक आरामदायी आणि सुरक्षेच्या दृष्टीने शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. जागतिक NCAP सुरक्षा चाचणीमध्ये या कारला 5 सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.

या कारमध्ये 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 160hp आणि 253Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तर दुसरे 1.5-लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले जे 115hp पॉवर आणि 143 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10.96 लाख रुपये आहे. तसेच Verna सेडान कारवर 25000 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे.