Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Cars Discount : संधीच करा सोनं! ह्युंदाई मोटर्सच्या या स्टायलिश कारवर मिळतेय 2 लाख रुपयांपर्यंत सूट, त्वरा करा…

ह्युंदाई मोटर्सची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सप्टेंबर महिना खास ठरू शकतो. कारण कंपनीकडून त्यांच्या अनेक कारवर लाखो रुपयांची सूट दिली जात आहे.

0

Hyundai Cars Discount : देशात सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे अनेक ऑटो कंपन्यांकडून त्यांच्या कारवर मोठी ऑफर देण्यात येत आहे. तुम्हालाही नवीन कार खरेदी करायची असेल तर ह्युंदाई मोटर्सची कार खरेदी करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या अनेक कारवर ३० सप्टेंबर पर्यंत मोठी ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही ह्युंदाई मोटर्सची कार खरेदी करून या महिन्यात हजारो रुपयांची बचत करू शकता. वेगवेगळ्या मॉडेल्सवर 2 लाख रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे.

ह्युंदाई मोटर्सच्या कारवर मोठी सूट मिळत आहे

ग्रँड i10 Nios

ह्युंदाई मोटर्सकडून ग्रँड i10 Nios हॅचबॅक कारवर मोठी सूट दिली जात आहे. या कारवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट, आणि ट्रान्समिशन व्हेरियंटवर 30,000 रुपयांची रोख सूट देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना एकूण 43,000 रुपयांचा फायदा होत आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 5.73 लाख ते 8.51 लाख रुपये आहे.

ह्युंदाई ऑरा

ह्युंदाई ऑरा कारवर देखील सप्टेंबर २०२३ मध्ये मोठी सूट दिली जात आहे. Aura च्या सर्व व्हेरियंटवर 3,000 ची कॉर्पोरेट सूट देण्यात येत आहे. 10,000 चे एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे. कारच्या पेट्रोल व्हेरियंटवर 10,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.

Aura च्या CNG व्हेरियंटवर 20,000 रुपयांपर्यंत रोख सूट दिली जात आहे. ऑरा कारच्या सीएनजी व्हेरियंटवर एकूण 33,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. पेट्रोल व्हेरियंटवर एकूण 23,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 6.33 लाख ते 8.90 लाख रुपये आहे.

i20, i20 एन लाइन

ह्युंदाई मोटर्सच्या i20 च्या सर्व व्हेरियंटवर 10,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस दिला जात आहे. कंपनी DCT व्हेरियंट, Sportz MT आणि इतर व्हेरियंटवर 30,000 25,000 आणि 10,000 रुपयांची रोख सूट दिली जात आहे. Hyundai i20 एन लाइन व्हेरियंटवर 50,000 रुपयांचे फायदे दिले जात आहेत. या कारची एक्स शोरूम किंमत 6.99 लाख ते 11.01 लाख रुपये आहे.

वेर्ना, अल्काझार, कोना इलेक्ट्रिक

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या Verna आणि Alcazar कारवर 25,000 आणि 20,000 चे एक्सचेंज बोनस ऑफर देण्यात येत आहे. तसेच त्यांच्या Kona Electric कारवर 2 लाखांची मोठी रोख सूट मिळत आहे.