Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Cars : ह्युंदाईच्या या मोठ्या निर्णयामुळे टाटा-मारुतीची बोलती बंद! प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उचलले मोठे पाऊल…

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या कारमधील सुरक्षेबाबत आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ह्युंदाईच्या नवीन कारमध्ये हे सेफ्टी फीचर्स पाहायला मिळणार आहेत.

0

Hyundai Cars : ह्युंदाई मोटर्सकडून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मारुती आणि टाटा मोटर्सची डोकेदुखी वाढली आहे. ह्युंदाई मोटर्सकडून आता त्यांच्या प्रत्येक नवीन कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स देणार आहे.

ह्युंदाई मोटर्स आता त्यांच्या प्रत्येक नवीन कारमध्ये 6 एअरबॅग प्रदान करणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत ह्युंदाईच्या कार आणखी सुरक्षित झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येक कारमध्ये 6 एअरबॅग देणारी ह्युंदाई मोटर्स पहिली कार निर्माता कंपनी आहे.

ह्युंदाई मोटर्सच्या लोकप्रिय सेडान Verna कारने ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळवले आहे. प्रौढ आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी 5-स्टार रेटिंग मिळवले आहे. त्यामुळे त्यांची Verna कार सुरक्षित कार मानली जात आहे. सुरक्षेच्या बाबतीत verna कार टाटा आणि स्कोडाशी स्पर्धा करते.

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या अनके कारमध्ये 6 एअरबॅग्ज ऑफर करण्यात आले आहे. ह्युंदाईने अलीकडेच सादर केलेल्या Exter एसयूव्ही कारमध्ये 6 एअरबॅग्ज दिल्या आहेत. ह्युंदाई मोटर्सकडून लवकरच त्यांच्या लोकप्रिय Grand i10 Nios, Aura आणि Venue कार 6 एअरबॅगसह अपडेट केल्या जाऊ शकतात. सध्या या कारमध्ये 4 एअरबॅग देण्यात येत आहेत.

ही वैशिष्ट्ये देखील मानक आहेत

२०२३ या वर्षाच्या सुरुवातीला ह्युंदाई मोटर्सने सीटबेल्ट रिमाइंडरसह थ्री-पॉइंट सीटबेल्ट बनवले होते जे कारच्या सर्व व्हेरियंटमध्ये देण्यात आले आहे. भारतातील सध्याच्या 13 Hyundai मॉडेलपैकी, 10 मध्ये ESC आणि हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल सारखी वैशिष्ट्ये देण्यात येत आहेत. यामध्ये नुकतीच सादर करण्यात आलेली Exter चा देखील समावेश आहे. मात्र Grand i10 Nios आणि Aura या कारचा यामध्ये समावेश नाही.

ह्युंदाई मोटर्सकडून आता त्यांच्या ३ कार भारत NCAP ला क्रॅश चाचणीसाठी तीन मॉडेल पाठवले आहेत आणि लवकरच आणखी मॉडेल पाठवणार असल्याची माहिती ह्युंदाई मोटर्सने दिली आहे. ह्युंदाई मोटर्सकडून कोणत्या कार क्रश चाचणीसाठी पाठवल्या जाणार आहे याची माहिती दिली नसली तरी लवकरच या कारचे सेफ्टी रेटिंग जाहीर केले जाऊ शकते.