Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Creta EV : Nexon EV ला टक्कर देण्यासाठी ह्युंदाईचा मोठा निर्णय! लॉन्च करणार क्रेटा EV, मिळणार ही खास वैशिष्ट्ये

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची क्रेटा EV कार लवकरच भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च केली जाणार आहे. कारमध्ये जबरदस्त बॅटरी पॅक दिला जाणार आहे.

0

Hyundai Creta EV : देशात महागाई वाढत असताना पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकांना पेट्रोल-डिझेलवरील कार वापरणे न परवडण्यासारखे झाले आहे. अशातच ऑटो मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कारचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध झाला आहे.

अनेकजण नवीन कार खरेदी करताना पेट्रोल-डिझेल कार खरेदी न करता इलेक्ट्रिक कारचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक कारच्या मागणीमध्ये देखील वाढ झाली आहे. इलेक्ट्रिक कारच्या मागणीमध्ये वाढ झाल्याने अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक कार सादर करत आहेत.

आता ह्युंदाई मोटर्स देखील त्यांची लोकप्रिय इलेक्ट्रिक कार क्रेटा EV सेगमेंटमध्ये सादर करणार आहे. २०२४ मध्ये ह्युंदाई क्रेटा EV कार सादर करू शकते. कारचे डिझाईन आणि फीचर्स देखील वेगळे असू शकतात. २०२४ च्या खेरीस किंवा २०२५ च्या अखेरीस क्रेटा EV लाँच होऊ शकते.

क्रेटा EV कारमध्ये DRL आणि LED लाईट्स पाहायला मिळू शकतात. कारच्या डिझाईनमध्ये मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे. तसेच क्रेटा EV कारमध्ये जबरदस्त बॅटरी पॅक देखील दिला जाऊ शकतो.

क्रेटा EV कारच्या केबिनमध्ये देखील बदल केले जाणार आहेत. क्रेटा EV कारच्या केबिनमध्ये प्रीमियम फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. क्रेटा EV कारमध्ये नवीन फुल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचा समावेश असू शकतो.

क्रेटा EV कार Ioniq 5 EV द्वारे प्रेरित असेल. तसेच नवीन EV कारमध्ये फ्रंट कॅमेरा, 360-डिग्री कॅमेरा आणि ADAS सूट देखील मिळू शकते. तसेच पॅनोरॅमिक सनरूफ, सर्व एलईडी लाईट्स असे फीचर्स देखील दिले जाऊ शकतात.

क्रेटा EV एसयूव्ही कार 2024 शेवटी किंवा 2025 मध्ये सादर केली जाऊ शकते. ह्युंदाई मोटर्सने क्रेटा EV कारवर काम सुरु केल्याचे सांगितले जात आहे. ही कार बाजारात सादर होताच आगामी टाटा कर्व ईव्ही, सिट्रोएन ई-सी३ एअरक्रॉस आणि होंडा एलिव्हेट ईव्हीशी टक्कर देईल.