Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Creta Facelift : क्रेटा अवतरणार नवीन रूपात! क्रेटा फेसलिफ्ट चाचणीदरम्यान स्पॉट, होणार मोठे बदल, पहा फोटो

क्रेटा कार प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता ह्युंदाई कार उत्पादक कंपनीकडून क्रेटा कारचे फेसलिफ्ट मॉडेल लवकरच ऑटो मार्केटमध्ये लॉन्च केले जाणार आहे.

0

Hyundai Creta Facelift : भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च होत आहेत. आता ह्युंदाई मोटर्स देखील त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही क्रेटा कारचे फेसलिफ्ट मॉडेल लवकरच लॉन्च करू शकते. क्रेटा फेसलिफ्ट चाचणी दरम्यान स्पॉट झाली आहे.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट कारमध्ये अनेक नवीन अपडेट्स पाहायला मिळणार आहेत. पुढील वर्षी ही लोकप्रिय एसयूव्ही कार नवीन अवतारात विक्रीसाठी बाजारात दाखल होईल. दक्षिण कोरियामध्ये सध्या या कारची चाचणी सुरु असतानाचे फोटो समोर आले आहेत.

नवीन स्पाय शॉट्समध्ये काय दाखवले होते?

फोटोमध्ये दिसत आहे की कार पूर्णपणे कव्हर केलेली आहे. जर फोटो जवळून पाहिल्यास कार पूर्वीपेक्षा आणखी स्टायलिश स्वरूपात पाहायला मिळत आहे. सर्वात मोठे अपडेट नवीन अलॉय व्हीलच्या स्वरूपात दिसून येत आहेत. या कारवर चाचणी दरम्यान SU2i असे लिहलेले आहे. Hyundai ने सध्याच्या Creta साठी हाच कोड वापरला आहे, जिथे SU2 म्हणजे वाहन आणि “i” म्हणजे भारत.

डिझाईन

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची आगामी भारतात विकली जाणारी क्रेटा फेसलिफ्ट परदेशात विकल्या जाणाऱ्या Palisade SUV वरून प्रेरित असणार आहे. या कारला स्प्लिट युनिट वर्टिकल हेडलॅम्प क्लस्टर मिळेल. कारमध्ये पॅलिसेडसारखे एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प मिळतील.

वैशिष्ट्ये

नवीन ह्युंदाई Creta फेसलिफ्ट कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा तसेच ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये दिले जाईल. कारला पुन्हा डिझाइन केलेले टेलगेट, एक नवीन बंपर आणि नवीन एलईडी टेल-लाइट मिळण्याची शक्यता आहे.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट इंजिन

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट नवीन एसयूव्ही कारमध्ये तीन इंजिन पर्याय दिले जाऊ शकतात. 1.5-लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन जे 115hp पॉवर तयार करू शकते. दुसरे 1.5L डिझेल इंजिन जे 115hp पॉवर जनरेट करू शकते आणि तिसरे 1.5-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन जे 160hp पॉवर तयार करू शकते.

कधी होणार लॉन्च ?

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या लोकप्रिय क्रेटा कारचे फेसलिफ्ट मॉडेल जानेवारी 2024 च्या मध्यापर्यंत देशात सुरु केले जाईल आणि फेब्रुवारीमध्ये लॉन्च केले जाऊ शकते. तसेच ह्युंदाई क्रेटा कारचे इलेक्ट्रिक मॉडेल देखील लवकरच बाजारात दाखल होईल.