Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Creta Facelift : क्रेटा फेसलिफ्ट मोठ्या बदलांसह लवकरच होणार लॉन्च, मिळणार हे लक्झरी फीचर्स

क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार नवीन बदलांसह पुन्हा एकदा लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स आणि लक्झरी केबिन दिली जाणार आहे.

0

Hyundai Creta Facelift : ह्युंदाई कार उत्पादक कंपनीकडून २०२४ मध्ये त्यांच्या नवीन एसयूव्ही कार सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना नवीन एसयूव्ही कारचा पर्याय मिळणार आहे. सध्या देशात एसयूव्ही कार खरेदीचा ट्रेंड सुरु आहे.

देशातील ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या एसयूव्ही कार उपलब्ध आहेत. तसेच ह्युंदाई मोटर्सची क्रेटा ही लोकप्रिय एसयूव्हीपैकी एक आहे. आता ह्युंदाई मोटर्स क्रेटा एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल लवकरच लॉन्च करणार आहे.

ह्युंदाई मोटर्सकडून क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार २०२४ च्या सुरुवातीला लॉन्च केली जाऊ शकते. कारमध्ये अनेक मोठे बदल केले जाऊ शकतात. तसेच कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने नवीन फीचर्स जोडले जाऊ शकतात.

Hyundai Creta फेसलिफ्ट लुक आणि डिझाइन

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारची चाचणी सुरु केली आहे. ही कार चाचणी दरम्यान अनेकदा दिसून आली आहे. सध्या या कारची चाचणी विदेशात केली जात आहे. कारचे काही फीचर्स आणि डिझाईन देखील लीक झाले आहे.

नवीन क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये स्प्लिट वर्टिकल हेडलाइट्स आणि Exeter-esque H-shaped LED DRLs पाहायला मिळतील. नवीन एसयूव्हीमध्ये अपडेटेड टेल लॅम्प सेटअप आणि मागील बाजूस नवीन टेलगेट दिला जाईल.

क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्हीला नवीन ग्रिल डिझाइन आकर्षक बंपर देखील जाऊ शकतो. कारच्या डिझाईनमध्ये अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. तसेच कारमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे नवीन इंजिन पर्याय जोडला जाऊ शकतो.

Hyundai Creta फेसलिफ्ट इंजिन

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारला नवीन इंजिन पर्याय दिला जाऊ शकतो. कारमध्ये 1.5-लीटर NA टर्बो-पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. तसेच कारमध्ये 1.5-लीटर NA पेट्रोल इंजिन आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन कायम ठेवले जाईल.

2024 Hyundai Creta इंटीरियर

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारच्या केबिनमध्ये अनके बदल केले जाऊ शकतात. कारच्या केबिनमध्ये प्रीमियम फीचर्स जोडले जातील. क्रेटा फेसलिफ्टला ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये दिले जाऊ शकते. कारच्या इंटीरियर थीममध्ये बदल अपेक्षित आहेत.