Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Creta Facelift : क्रेटा फेसलिफ्ट दिसणार अशी ! पहिल्यांदाच समोर आले फोटो, पहिल्यापेक्षा असणार इतकी शक्तिशाली

0

Hyundai Creta Facelift : ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही कार क्रेटाचे फेसलिफ्ट मॉडेल लवकरच लॉन्च केले जाणार आहे. ही कार चाचणी दरम्यान भारतीय आणि विदेशी रस्त्यावर दिसून आली आहे. कारच्या डिझाईनमध्ये मोठे अपडेट्स पाहायला मिळत आहेत.

ह्युंदाई मोटर्स त्यांच्या क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारला पूर्णपणे नवीन डिझाईन देणार आहे. तसेच कारमध्ये आणखी जबरदस्त सुरक्षा फीचर्स देखील देणार आहे. या कारच्या डिझाईनचे फोटो प्रथमच समोर आले आहेत.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट बाहेरील आणि अंतर्गत डिझाईन

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारला नवीन डिझाइन देण्यात आले आहे. हेडलॅम्प डिझाइनमध्ये नवीन एलईडी डीआरएल आणि अनुक्रमिक वळण निर्देशक आणि मागील बाजूस टेल लॅम्प देण्यात आले आहे. कारमध्ये नवीन फ्रंट ग्रिल, पुढचे आणि मागील बंपर देखील नवीन डिझाईन केलेले असणार आहे.

2024 क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारच्या इंटिरियर केबिनमध्ये देखील मोठे बदल दिसतील. क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये ड्युअल टोन अपहोल्स्ट्री, साइड एसी व्हेंट्स, कनेक्टेड स्क्रीनसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ड्राइव्ह मोड्स अशी वैशिष्ट्ये देण्यात येतील. तर सुरक्षेसाठी 6 एअरबॅग, 360 डिग्री पार्किंग कॅमेरा, ट्रॅक्शन कंट्रोल, ABS, EBD आणि ESP अशी वैशिष्ट्ये देण्यात येणार आहेत.

Hyundai Creta फेसलिफ्टची ADAS वैशिष्ट्ये

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये लेव्हल 2 ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात येणार आहे. या ADAS फीचर्समध्ये ब्लाइंड स्पॉट कोलिजन वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट कोलिशन अवॉयडन्स असिस्ट, अवॉयडन्स असिस्टसह फॉरवर्ड कोलिजन अलर्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन कीप असिस्ट, लेन फॉलो असिस्ट, स्मार्ट क्रूझ कंट्रोल, फ्रंट व्हेइकल डिपार्चर वॉर्निंग, ड्रायव्हर अटेंशन हाय अलर्ट, अॅलर्ट अॅलर्ट अशी वैशिष्ट्ये मिळतील.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट इंजिन

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये 1.5 लिटर NA पेट्रोल इंजिन देण्यात येईल. तसेच कारमध्ये 1.5 लिटर डिझेल इंजिन देखील दिले जाणार आहे. क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये नवीन 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात येईल.