Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Creta : ग्रँड विटारा, स्कॉर्पिओ, सेल्टोसला मागे टाकत ह्युंदाईची ही SUV बनली नंबर वन! कमी किमतीत मिळतात जबरदस्त फीचर्स

ह्युंदाई मोटर्सची लोकप्रिय एसयूव्ही कार देशातील मिडसाईझ एसयूव्ही विक्रीमध्ये नंबर वन बनली आहे. या कारने मारुती आणि किआ एसयूव्ही कारला मागे टाकत नंबर वन बनली आहे.

0

Hyundai Creta : देशातील सर्वच कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या कार विक्रीचे सप्टेंबर २०२३ मधील अहवाल सादर करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक कार कंपन्यांच्या एसयूव्ही कारची विक्री जोरदार झाल्याचे दिसत आहे. मिडसाईज एसयूव्ही कारच्या सर्वाधिक विक्रीमध्ये ह्युंदाईने आघाडी मारली आहे.

ह्युंदाईची क्रेटा एसयूव्ही कार मिडसाईज एसयूव्हीच्या विक्रीमध्ये नंबर वन ठरली आहे. गेल्या सप्टेंबर २०२३ या महिन्यात क्रेटा कारची एकूण 12,717 युनिट्सची विक्री झाली आहे तर दुसऱ्या नंबरवर महिंद्रा स्कॉर्पिओ कारचा नंबर लागला आहे. महिंद्रा स्कॉर्पिओची या महिन्यात 11,846 युनिट्सची विक्री झाली आहे. तर तिसऱ्या नंबरवर मारुतीची ग्रँड विटारा एसयूव्ही कार आहे. या कारची गेल्या महिन्यात 11,736 युनिट्सची विक्री झाली आहे.

क्रेटा फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करण्याची तयारी

ह्युंदाईच्या क्रेटा एसयूव्हीला जोरदार प्रतिसाद मिळत असतानाच आता कंपनीकडून क्रेटा कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले जाणार आहे. ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट अनेकदा चाचणी दरम्यान रस्त्यावर दिसून आली आहे. या कारमध्ये ADAS सुरक्षा, 360 डिग्री कॅमेरा, फ्रंट पार्किंग सेन्सर, नवीन इंटीरियर दिले जाण्याची शक्यता आहे.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट डिझाइन

कारच्या फ्रंट फॅसिआला रिफ्रेश लुक मिळू शकतो. कारच्या हेडलाइट्स, एलईडी डीआरएल आणि ग्रिल डिझाइनमध्ये बदल दिसून येतील. नवीन ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट कारमध्ये नवीन आकर्षक अलॉय व्हील्स पाहायला मिळतील.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट पॉवरट्रेन

सध्या ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट कारमध्ये देण्यात येणारे पेट्रोल आणि डिझेल इंजिन कायम ठेवण्यात येईल. 1.4-लीटर टर्बो पेट्रोल इंजिनची जागा नवीन 1.5-लीटर टर्बो इंजिन घेईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे इंजिन 160 Ps ची पॉवर आणि 253 Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल. इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड DCT ट्रान्समिशन पर्यायांसह येते.

ADAS प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये दिले जाईल

क्रेटा फेसलिफ्ट कारमध्ये ADAS नवीन सुरक्षा फीचर्स देण्यात येईल. नवीन क्रेटा फेसलिफ्ट कारमध्ये अनेक नवीन फीचर्स पाहायला मिळतील. त्यामुळे नवीन कारमध्ये आणखी जबरदस्त सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात येणार असल्याने ही कार आणखी सुरक्षित होणार आहे.