Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Elantra N : उत्कृष्ट मायलेज आणि शक्तिशाली इंजिन! Hyundai ने लॉन्च केली स्टायलिश नवीन सेडान; जाणून घ्या किंमत

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची आणखी एक शानदार सेडान कार सादर जबरदस्त फीचर्स तसेच शक्तिशाली इंजिनने ही कार सुसज्ज आहे.

0

Hyundai Elantra N : भारतीय बाजारात Hyundai च्या बऱ्याच कारला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. कंपनीदेखील मार्केटची गरज पाहता सतत नवनवीन कार लॉन्च करत असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कंपनीच्या ग्राहकवर्गाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

अशातच आता कंपनीकडून जागतिक स्तरावर नवीन Elantra N लॉन्च करण्यात आली आहे. आतापर्यंत कंपनीकडून ही प्रीमियम सेडान दक्षिण कोरियात Avante N आणि ऑस्ट्रेलियामध्ये i30 Sedan N म्हणून विक्री केली आहे. जाणून घेऊयात फीचर्स.

Hyundai Elantra N चे डिझाइन

कंपनीकडून आपल्या नवीन Elantra N च्या बाह्य डिझाईनमध्ये अनेक महत्त्वाचे अपडेट्स देण्यात आले आहेत ज्यात मागील स्पॉयलर, विस्तीर्ण फ्रंट, अपडेटेड ग्रिलसह ‘N’ बॅज, साइड सिल्स, 19-इंच चाके आणि ड्युअल एक्झॉस्ट टिप्स यांचा समावेश आहे. नवीन हेडलाइट जास्त आकर्षक असून DRL बोनेटच्या संपूर्ण रुंदीवर त्या चालतात.

इंटीरियर

कंपनीच्या नवीन Elantra च्या इंटिरिअरबद्दल सांगायचे झाले तर, Hyundai Elantra N मध्ये स्टँडर्ड मॉडेलच्या तुलनेत स्पोर्टियर बकेट सीट्स उपलब्ध करून दिली आहेत. तसेच ते कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, 4.2-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मल्टी-लेव्हल सॉफ्ट-टच, बोस स्पीकर्ससह 10.25-इंच इंफोटेनमेंट सिस्टम यासारख्या अनेक शानदार फीचर्ससह जोडले आहे.

नवीन अपडेट

कंपनीने आपल्या नवीन Elantra N च्या हाताळणीत सुधारणा करण्यासाठी काही महत्त्वाचे बदल केले आहेत, जसे की इंजिन माउंट मजबूत करणे, ESC मध्ये बदल, सस्पेंशन आणि चांगल्या स्टीयरिंग नियंत्रणासाठी कमी संयुक्त घर्षण असणारे नवीन स्टीयरिंग गियर बॉक्स त्याशिवाय बॅलन्सिंगसाठी एक्सलला नवीन टायर प्रेशर दिले आहे.

Hyundai Elantra N इंजिन

कंपनीच्या नवीन Elantra N ला उर्जा देण्यासाठी त्यामध्ये 2.0-लीटर GDI टर्बोचार्ज केलेले इंजिन बसवण्यात आले आहे जे कंपनीकडून खास N श्रेणीसाठी डिझाइन करण्यात आले आहे. हे इंजिन 276 bhp ची पॉवर आणि 392 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. इंजिनला 6-स्पीड मॅन्युअल किंवा 8-स्पीड DCT गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे. या इंजिनमुळे ही सेडान ताशी 280 किलोमीटरपर्यंतचा वेग गाठेल, असा दावा कंपनीने केला आहे.