Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Exeter : Hyundai च्या ‘या’ शक्तिशाली SUV ला मिळाले सर्वाधिक बुकिंग, जाणून घ्या किंमत…

Hyundai ची ही शक्तिशाली SUV 75 हजारांपेक्षा जास्त लोकांनी बुक केली असून यात उत्तम फीचर्स दिले आहेत.

0

Hyundai Exeter : भारतीय बाजारात आता वेगवेगळ्या कंपन्यांच्या कार्स लाँच होतात. तुम्ही पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक पर्यायात या कार खरेदी करू शकता. प्रत्येक कारमध्ये हटके फिचर कंपनी आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत असते.

Hyundai ही भारतीय बाजारात असणारी एक लोकप्रिय कार निर्माता कंपनी आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपली एक कार लाँच केली होती.तिला सर्वाधिक बुकिंग मिळाले आहेत. 6 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत तुम्ही ती खरेदी करू शकता.

किती झाले बुकिंग? जाणून घ्या

बाजारात लॉन्च झाल्यापासून केवळ तीन महिन्यांमध्ये Hyundai च्या एक्सेटरला 75,000 बुकिंग मिळाले असून या कारच्या आतापर्यंत 23,000 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री झालेली आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये Hyundai च्या micro SUV ने अनुक्रमे 7,000 युनिट्स, 7,430 युनिट्स आणि 8,647 युनिट्सची विक्री केलेली आहे.

Hyundai Exeter पॉवरट्रेन

Hyundai ने आपल्या Exeter मध्ये नवीन ग्राहकांसाठी 1.2-लिटर, चार-सिलेंडर, नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन उपलब्ध करून दिले आहे, जे 83hp आणि 114Nm निर्माण करते. हे लक्षात घ्या की तुम्हाला इंजिन Grand i10 Nios hatchback, i20 hatch आणि Venue subcompact SUV मध्ये पाहायला मिळते. इतकेच नाही तर यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे. यात मॅन्युअल गिअरबॉक्ससह सीएनजी आवृत्ती उपलब्ध असणार आहे, जी 69bhp आणि 95.2Nm आउटपुट तयार करते.

जाणून घ्या फीचर्स

Hyundai च्या Exeter मध्ये 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्वयंचलित हवामान नियंत्रण, वायरलेस चार्जिंग, ड्युअल कॅमेर्‍यांसह डॅशकॅम, 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, तीन-पॉइंट सीटबेल्ट, सर्व आसनांसाठी सीटबेल्ट रिमाइंडर आणि मागील पार्किंग सेन्सर आणि कॅमेरा यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय यात अनेक फीचर्स दिली आहेत.