Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Exter : 6 लाख किंमत, 6 एअरबॅग्स आणि 27 Kmpl मायलेज! ह्युंदाईची मायक्रो SUV खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

ह्युंदाई मोटर्सने त्यांची सर्वात लहान एसयूव्ही कार भारतात लॉन्च करताच ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत.

0

Hyundai Exter : ह्युंदाई मोटर्सने अलीकडेच त्यांची मायक्रो एसयूव्ही कार लॉन्च केली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय देण्यात आला आहे. ४ महिन्यतच या कारने इतर एसयूव्ही कारला विक्रीमध्ये मागे टाकले आहे.

ह्युंदाई मोटर्सने अगदी कमी बजेटमध्ये त्यांची शानदार एसयूव्ही कार भारतीय ऑटो बाजारात लॉन्च केली आहे. Exter एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत.

ह्युंदाई Exter एसयूव्ही कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत. कारमध्ये 6 एअरबॅग पर्याय देण्यात आले आहेत. Exter एसयूव्ही कारची किंमत देखील खूपच कमी आहे.

ह्युंदाई Exter किंमत

ह्युंदाई Exter कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होते. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.15 लाख रुपये आहे. ह्युंदाईने या कारची किंमत १६ हजार रुपयांनी वाढवली आहे.

ह्युंदाई Exter इंजिन आणि ट्रान्समिशन

ह्युंदाई Exter एसयूव्ही कारमध्ये 1.2-लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 83ps पॉवर आणि 114nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. Exter एसयूव्ही कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.

तसेच कारमध्ये सीएनजी पर्याय देण्यात आला आहे. Exter एसयूव्ही कारचे पेट्रोल व्हेरियंट 19.4 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे तर सीएनजी मॉडेल 27.1 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

ह्युंदाई Exter वैशिष्ट्ये

Exter एसयूव्ही कारमध्ये 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, MID सह 4.2-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर, सिंगल पेन सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि ड्युअल कॅमेऱ्यासह डॅश कॅम सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

तसेच कारमध्ये 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), वाहन स्थिरता व्यवस्थापन (VSM), हिल होल्ड असिस्ट आणि 3-पॉइंट सीट बेल्ट अशी सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.