Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Exter CNG : स्वस्तात कार खरेदीची सुवर्णसंधी! फक्त 1 लाखात घरी आणा ह्युंदाईची शानदार SUV, असा घ्या लाभ

नवीन कार खरेदीचे स्वप्न आता अवघ्या १ लाखत पूर्ण होईल. ह्युंदाई मोटर्सची मायक्रो एसयूव्ही तुम्ही कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता.

0

Hyundai Exter CNG : भारतीय ऑटो बाजारात दिवसेंदिवस मायक्रो एसयूव्हीच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. अनेकांना या मायक्रो एसयूव्ही कार खरेदी करायच्या असतात मात्र त्या खरेदी करण्यासाठी बजेट कमी पडते.

जर तुमचे बजेट कमी असेल तर टेन्शन घेऊ नका. कारण आता तुम्ही अगदी १ लाखात ह्युंदाईची शानदार एसयूव्ही Exter कार घरी आणू शकता. Exter कारमध्ये ग्राहकांना सीएनजी पर्याय देखील ऑफर करण्यात आला आहे.

कारमध्ये देण्यात येणारे फीचर्स आणि कमी किमतीमुळे ही कार ग्राहकांना अधिक आकर्षित करत आहे. या कारच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. तुम्ही देखील Exter ही कार १ लाख रुपयांमध्ये घरी आणू शकता.

किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची Exter एसयूव्ही कार EX, S, SX, SX (O) आणि SX (O) Connect अशा व्हेरियंटमध्ये सादर केली आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.10 लाख रुपयांपर्यंत जाते.

सीएनजी व्हर्जनमध्ये ही कार २७.१ किमी/किलोपर्यंत मायलेज देते. ह्युंदाई मोटर्सकडून कारमध्ये 6 एअरबॅग देण्यात आल्या आहेत. तसेच कारमध्ये डॅशकॅम, व्हॉईस कमांडसह इलेक्ट्रिक सनरूफ आणि मोठी टचस्क्रीन देखील देण्यात आली आहे.

१ लाख रुपयांच्या डाउनपेमेंटमध्ये घरी आणा ह्युंदाई Exter

तुमचेही कार खरेदीचे स्वप्न असेल आणि बजेट कमी पडत असेल तर काळजी करू नका. कारण आता तुम्ही फक्त १ लाख रुपयांच्या डाउनपेमेंटमध्ये ह्युंदाई Exter कार घरी आणू शकता. Exter सीएनजी कारची किंमत 8.24 लाख रुपयांपासून सुरु होते.

Hyundai exter CNG टॉप मॉडेल

ह्युंदाई Exter सीएनजीचे टॉप मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 8.97 लाख रुपये आणि ऑन-रोड किंमत 10,18,273 रुपये आहे. जर तुम्ही 1 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बाकीचे पैसे कर्जाच्या स्वरूपात घ्यावे लागतील.

हे कर्ज तुम्हाला 5 वर्षांसाठी दिले जाईल. यावर तुमच्याकडून वार्षिक 9 टक्के व्याजदर आकारला जाईल. तसेच कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला दरमहा 19,062 रुपयांचा EMI भरावा लागेल. याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही जवळच्या ह्युंदाई डिलरशिपला भेट देऊ शकता.