Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Exter : ह्युंदाईच्या ‘या’ छोट्या कारने टाटा मोटर्सला फोडला घाम! 6 लाखांच्या किमतीत देते 30 Kmpl मायलेज

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची मायक्रो एसयूव्ही सादर करताच टाटा मोटर्सच्या पंच कारला टक्कर देत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे टाटा मोटर्सचे टेन्शन वाढले आहे.

0

Hyundai Exter : देशातील ऑटो बाजारात कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या मागणीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. अनेक कंपन्यांकडून त्यांच्या एसयूव्ही कार ऑटो बाजारात सादर केल्या आहेत. ग्राहकांचा देखील एसयूव्ही कारला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शहरी भागात राहणाऱ्या राहणारे नागरिक सध्या मायक्रो एसयूव्ही कारला चांगली पसंती देत आहेत. ह्युंदाई मोटर्सने त्यांची जुलै महिन्यात मायक्रो एसयूव्ही कार लॉन्च केली आहे. या एसयूव्ही कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टाटा मोटर्सकडून त्यांची पंच ही मायक्रो एसयूव्ही देखील भारतीय ऑटो बाजारात सादर केली आहे. या कारला देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र ह्युंदाई मोटर्सच्या Exter कारने विक्रीच्या बाबतीत आता टाटा पंचला देखील मागे टाकत असल्याचे दिसत आहे.

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची मायक्रो एसयूव्ही Exter कार लॉन्च केल्यापासून या कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या कारमध्ये टाटा पंच पेक्षा जास्त व्हील बेस देण्यात आला आहे. एसयूव्ही कारमध्ये जागा देखील खूप देण्यात आली आहे.

ह्युंदाई Exter कारमध्ये प्रीमियम फीचर्स पाहायला मिळतात. शक्तिशाली इंजिनसह या कारचे मायलेज देखील जबरदस्त आहे. त्यामुळे कमी बजेटमध्ये एसयूव्ही कार खरेदी करणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

शक्तिशाली इंजिन आणि उत्तम मायलेज

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या मायक्रो एसयूव्ही कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. कारमध्ये 1.2 लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 81.8 Bhp पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच सीएनजी मोडमध्ये या कारचे इंजिन 67.72 Bhp पॉवर जनरेट करते.

ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल गिअरबॉक्स पर्यायासह ही कार ऑफर करण्यात आली आहे. ह्युंदाई मायक्रो एसयूव्ही Exter कार पेट्रोल व्हर्जनमध्ये २१ किलोमीटर प्रति लिटर आणि सीएनजी मोडमध्ये 30 किलोमीटर प्रति किलोपर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. त्यामुळे ही कार चालवण्यास जास्त खर्च देखील येणार नाही.

उत्कृष्ट वैशिष्ट्ये

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या Exter कारमध्ये अनेक प्रीमियम फीचर्स दिले आहेत. या कमी बजेट कारमध्ये कंपनीकडून सनरूफ देखील देण्यात आले आहे. Exter कारमध्ये इन्फोटेनमेंट सिस्टीम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, क्लायमेट कंट्रोल एसी, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक, चाइल्ड लॉक, 6 एअरबॅग्ज, ABS, EBD अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

किंमत देखील खूप कमी आहे

कमी बजेट ग्राहकांसाठी ह्युंदाई Exter ही मायक्रो एसयूव्ही बेस्ट पर्याय आहे. कारण या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.10 लाख रुपये आहे. ह्युंदाई Exter सीएनजी कारची एक्स शोरूम किंमत 8.24 लाख रुपये आहे.