Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Exter Price Hike : नवरात्रीच्या तोंडावर ग्राहकांच्या खिशाला कात्री! ह्युंदाईने मायक्रो SUV Exter च्या किमतीत केली मोठी वाढ, पहा नवीन किंमत

ह्युंदाई मोटर्सने नवरात्रीच्या तोंडावर ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. लोकप्रिय मायक्रो एसयूव्ही Exter च्या किमतीमध्ये मोठी वाढ केली आहे.

0

Hyundai Exter Price Hike : ह्युंदाई मोटर्सने जुलै २०२३ या महिन्यात त्यांची मायक्रो एसयूव्ही कार भारतीय ऑटो बाजारात लॉन्च केली आहे. या कारला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. मात्र ह्युंदाईने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. Exter एसयूव्ही कारच्या किमतीमध्ये मोठी वाढ केली आहे.

ह्युंदाई Exter एसयूव्ही कार ६ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीमध्ये सादर करण्यात आली आहे. कारच्या किमतीमध्ये कंपनीकडून पहिल्यांदाच वाढ करण्यात आली आहे. कंपनीकडून Exter एसयूव्ही कारच्या किमतीमध्ये १६ हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. कारच्या EX MT आणि SX (O) Connect AMT हे व्हेरियंट वगळता बाकी व्हेरियंटच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

ह्युंदाई Exter एसयूव्हीच्या SX(O) Connect MT ड्युअल-टोन व्हेरियंटच्या किमतीमध्ये कंपनीकडून वाढ करण्यात आली आहे. कारच्या या व्हेरियंटची किंमत 16,000 हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. तसेच टॉप व्हेरियंट SX (O) Connect AMT ड्युअल-टोन व्हेरियंटची किंमत 5,000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.

Hyundai Exter 6 व्हेरियंटमध्ये येते

ह्युंदाईने त्यांची Exter एसयूव्ही कार 6 व्हेरियंटमध्ये लॉन्च केली आहे. EX, EX(O), S, SX, SX(O), आणि SX(O) Connect अशा व्हेरियंटमध्ये Exter एसयूव्ही ऑफर करण्यात आली आहे. या कारमध्ये ९ रंग पर्याय देण्यात आले आहेत.

अॅटलस व्हाइट, कॉस्मिक ब्लू, फायरी रेड, रेंजर खाकी, स्टाररी नाईट, टायटन ग्रे, अॅटलस ब्लॅक विथ अॅबिस ब्लॅक, कॉस्मिक ब्लू विथ अॅबिस ब्लॅक हे ९ रंग पर्याय Exter एसयूव्ही कारमध्ये उपलब्ध आहेत.

ह्युंदाई Exter इंजिन

ह्युंदाई मोटर्सने त्यांच्या मायक्रो एसयूव्ही Exter मध्ये 1.2-लिटर, चार-सिलेंडर, NA पेट्रोल इंजिन दिले आहे जे ५ स्पीड मॅन्युअल किंवा AMT गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. या कारमध्ये सीएनजी पर्याय देखील देण्यात आला आहे. कारचे इंजिन 82bhp आणि 114Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

ह्युंदाई Exter वैशिष्ट्ये

ह्युंदाई Exter एसयूव्ही कारमध्ये धमाकेदार वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कारमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ पर्याय ऑफर करण्यात आला आहे. ड्युअल कॅमेर्‍यांसह डॅश कॅम युनिट आणि 2.31-इंच डिजिटल डिस्प्लेसह ही कार सादर करण्यात आली आहे.

कारमध्ये ABS सह EBD, कीलेस एंट्री, सर्व सीटसाठी 3-पॉइंट सीट बेल्ट, फ्रंट पॉवर विंडो, मागील हेडरेस्ट्स, सीट बेल्ट रिमाइंडर, एलईडी टेल-लॅम्प, सेंट्रल लॉकिंग सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मॅन्युअल एसी अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने कारमध्ये 6 एअरबॅग्ज, 3-पॉइंट सीट बेल्ट आणि सीटबेल्ट रिमाइंडर (सर्व सीटसाठी), कीलेस एंट्री, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), मागील पार्किंग सेन्सर्स, ESS अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.