Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Exter Price : दमदार मायलेज आणि तगड्या फीचर्ससह लॉन्च झाली ह्युंदाईची सर्वात स्वस्त Exter SUV, जाणून घ्या किंमत

तुम्हीही स्वस्तातील SUV कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण ह्युंदाईची सर्वात स्वस्त Exter SUV कार लॉन्च झाली आहे.

0

Hyundai Exter Price : ह्युंदाई कंपनीच्या अनेक कार सध्या भारतीय ऑटो क्षेत्रात उपलब्ध आहेत. तसेच ह्युंदाई कंपनीकडून त्यांची आणखी एक नवीन कार आज १० जुलै रोजी लॉन्च करण्यात आली आहे. ह्युंदाईची Exter कार आज भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आली आहे.

ह्युंदाई कंपनीकडून त्यांची स्वस्तातील कार लॉन्च करण्यात आली आहे. या कारमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. चला तर जाणून घेऊया ह्युंदाई Exter ची किंमत आणि वैशिष्ट्ये

Hyundai Exter ची किंमत किती आहे?

ह्युंदाई कंपनीकडून त्यांची Exter कार आज अधिकृतरित्या लॉन्च करण्यात आली आहे. या कारचे एकूण ६ व्हेरियंट लॉन्च करण्यात करण्यात आले आहेत. या कारच्या बेस व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 5.99 लाख पासून सुरू होते आणि टॉप व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 9.31 लाख रुपयांपर्यंत जाते.

ह्युंदाई कंपनीच्या इतर SUV कारपैकी Exter SUV कार सर्वात लहान आहे. त्यामुळे ही कार सर्वात स्वस्त देखील आहे. तसेच तुमचे देखील कमी बजेट असेल तर तुम्ही ह्युंदाई कंपनीची ही नवीन SUV कार खरेदी करू शकता.

ह्युंदाई Exter व्हेरियंट आणि वैशिष्ट्ये

ह्युंदाई कंपनीकडून Exter कारची एकूण ६ व्हेरियंट लॉन्च करण्यात आली आहेत. Hyundai Xtor EX, EX(O), S, S(O), SX, SX(O) आणि SX(O) Connect अशी व्हेरियंट लॉन्च करण्यात आली आहेत.

या कारमध्ये एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेललॅम्प, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, ESC आणि हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोलसह अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Hyundai Exter रंग पर्याय

Hyundai Exter कारमध्ये अनके रंग पर्याय देण्यात येत आहेत. सर्व रंग पर्यायामध्ये रेंजर खाकी आणि कॉस्मिक ब्लू शेड्स समाविष्ट आहे. व्हाइट, स्टारी नाइट, फियरी रेड, एटलस व्हाइट, टाइटन ग्रे असे रंग पर्याय देण्यात आले आहेत.

Hyundai Exter इंजिन पर्याय

Hyundai Exter कारमध्ये कंपनीकडून E20 फ्युएल-इंजेक्टेड 1.2-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 81.86 Bhp कमाल पॉवर आणि 113.8 Nm पीक टॉर्क जनरेट करते. तसेच कारमध्ये सीएनजी पर्याय देखील देण्यात आला आहे. CNG आवृत्तीमध्ये या कारचे इंजिन 68 bhp आणि टॉर्क 95.2 Nm जनरेट करते. पेट्रोल Exter कार 19.4 (MT) आणि 19.2 kmpl (AMT) पर्यंत मायलेज देते. तसेच सीएनजी आवृत्तीमध्ये ही कार 27.1 kmpl पर्यंत मायलेज देते.

मायलेज

Hyundai Exter Petrol MT: 19.4 kmpl
Hyundai Exter Petrol AMT: 19.2 kmpl
Hyundai Exter CNG: 27.10 kmpl

किमती

Hyundai Exter प्रकारानुसार किंमत (रु मध्ये)

Hyundai Exter EX MT: 5,99,900 रुपये
Hyundai Exter S MT: 7,26,900 रुपये
Hyundai Exter AMT: 7,96,980 रुपये
Hyundai Exter SX: 7,99,900 रुपये
Hyundai Exter CNG: 8,23,990 रुपये
Hyundai Exter SX(O): 8,63,900 रुपये
Hyundai Exter SX(O) कनेक्ट: 9,31,990 रुपये