Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Exter : ह्युंदाईच्या Exter स्टायलिश मायक्रो SUV ची बाजारात प्रचंड क्रेझ, जाणून घ्या व्हेरियंट्स आणि किमती

ह्युंदाई मोटर्सकडून गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांची मायक्रो SUV भारतीय ऑटो बाजारात लॉन्च केली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

0

Hyundai Exter : भारतीय ऑटो बाजारात दिवसेंदिवस अनेक कंपन्यांच्या नवनवीन एसयूव्ही कार लॉन्च होत आहेत. या एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच ग्राहकांच्या गरज ओळखून कारच्या किमती देखील कमी ठेवत आहेत.

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची मायक्रो एसयूव्ही कार Exter लॉन्च केली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑटो मार्केटमध्ये एसयूव्ही सेगमेंटमध्ये या कारचे वर्चस्व असल्याचे दिसत आहे.

ह्युंदाई मोटर्सने अगदी ६ लाख रुपयांच्या किमतीमध्ये त्यांची मायक्रो एसयूव्ही Exter लॉन्च केली आहे. तसेच या कारमध्ये शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद या कारला मिळत आहे.

Exter एसयूव्हीचे बाजारात एकूण किती व्हेरियंट आहेत?

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची Exter एसयूव्ही कार एकूण ५ व्हेरियंटमध्ये लॉन्च केली आहे. या कारची EX, S, SX, SX (O) आणि SX (O Connect) अशी व्हेरियंट बाजारात उपलब्ध आहेत.

तसेच ह्युंदाई मोटर्सने Exter एसयूव्हीच्या S आणि SX व्हेरियंटमध्ये सीएनजी पर्याय ऑफर केला आहे. या कारमध्ये 1.2-लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 83PS पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा 5-स्पीड AMT शी जोडलेले आहे. कारचे इंजिन सीएनजी मोडमध्ये 69PS पॉवर आणि 95Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. सीएनजी पर्यायांमध्ये इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह जोडलेले आहे.

Hyundai Exter च्या सर्व व्हेरियंटच्या एक्स शोरूम किंमती –

1.2 l कप्पा पेट्रोल 5-स्पीड मॅन्युअल एक्सटर – EX: 5,99,900 रुपये
1.2 l कप्पा पेट्रोल 5-स्पीड मॅन्युअल EXTER – EX (O): 6,24,990 रुपये
1.2 l कप्पा पेट्रोल 5-स्पीड मॅन्युअल एक्सटर – एस: 7,26,990 रुपये
1.2 l कप्पा पेट्रोल 5-स्पीड मॅन्युअल EXTER – S (O): 7,41,990 रुपये
1.2 l कप्पा पेट्रोल स्मार्ट ऑटो AMT EXTER – S: 7,96,980 रुपये
1.2 l कप्पा पेट्रोल 5-स्पीड मॅन्युअल EXTER – SX: 7,99,990 रुपये
1.2 l कप्पा पेट्रोल 5-स्पीड मॅन्युअल एक्सटर – एसएक्स ड्युअल टोन: 8,22,990 रुपये
1.2 l कप्पा पेट्रोल 5-स्पीड मॅन्युअल EXTER – SX (O): 8,63,990 रुपये
1.2 l कप्पा पेट्रोल स्मार्ट ऑटो AMT EXTER – SX: 8,67,990 रुपये

1.2 l कप्पा पेट्रोल स्मार्ट ऑटो AMT EXTER – SX ड्युअल टोन: 8,90,990 रुपये
1.2 l कप्पा पेट्रोल 5-स्पीड मॅन्युअल EXTER – SX (O) कनेक्ट: 9,31,990 रुपये
1.2 l कप्पा पेट्रोल स्मार्ट ऑटो AMT EXTER – SX (O): 9,31,990 रुपये
1.2 l कप्पा पेट्रोल 5-स्पीड मॅन्युअल EXTER – SX (O) कनेक्ट ड्युअल टोन: 9,41,990 रुपये
1.2 l कप्पा पेट्रोल स्मार्ट ऑटो AMT EXTER – SX (O) कनेक्ट: 9,99,990 रुपये
1.2 l कप्पा पेट्रोल स्मार्ट ऑटो AMT EXTER – SX (O) कनेक्ट ड्युअल टोन: 10,09,990 रुपये
1.2 l कप्पा द्वि-इंधन CNG 5-स्पीड मॅन्युअल EXTER – S CNG: 8,23,990 रुपये
1.2 l कप्पा द्वि-इंधन CNG 5-स्पीड मॅन्युअल एक्सटर – SX CNG: 8,96,990 रुपये