Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Exter : ह्युंदाईच्या स्वस्तातील नवीन SUV कारमध्ये मिळतात हे भन्नाट फीचर्स, जाणून तुम्हीही व्हाल चकित

तुम्हीही नवीन कमी बजेटमधील आणि परिपूर्ण फीचर्स असलेली एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Hyundai Exter ही कार सर्वोत्तम ठरू शकते.

0

Hyundai Exter : भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये Hyundai Motor कडून त्यांची आणखी एक एसयूव्ही कार लॉन्च करण्यात आली आहे. Hyundai Exter असे या मध्यम आकाराच्या एसयूव्ही कारचे नाव आहे. या कारमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.

कमी बजेट असणारे ग्राहक ही कार खरेदी करू शकतात. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5.99 लाख रुपये आहे. या कारमध्ये पेट्रोल इंजिनसह सीएनजीचा देखील पर्याय देण्यात येत आहे. चला तर जाणून घेऊया या मध्यम आकाराच्या एसयूव्ही कारचे फीचर्स…

6 एअरबॅग्ज

Hyundai Exter कारमध्ये 6 एअरबॅग देण्यात आल्या आहेत. या सेगमेंटमधील कोणत्याही एसयूव्ही कारमध्ये 6 एअरबॅग देण्यात येत नाहीत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही कार सर्वात सुरक्षित मानली जात आहे. या सेगमेंटमधील बाकी एसयूव्ही कारला ड्युअल एअरबॅग्ज किंवा चार एअरबॅग्ज मिळतात.

सनरूफ

Hyundai Exter या सेगमेंटमधील कारला पहिल्यांदाच सनरूफचे वैशिष्ट्य देण्यात येत आहे. सनरूफचे वैशिष्ट्य हे या सेगमेंटमधील कारच्या वरच्या मॉडेलमध्ये दिले जाते. तुम्ही इंग्रजी कमांडसह हिंदीसह व्हॉईस कमांडद्वारे देखील सनरूफ ऑपरेट केले जाऊ शकते.

डॅश कॅम

डॅशकॅम हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे जे आधुनिक कारमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत आहे, ज्याचा एक्स्टरमध्येही समावेश करण्यात आला आहे. या डॅशकॅममध्ये अनेक रेकॉर्डिंग मोडही देण्यात आले आहेत.

पॅडल शिफ्टर्स

Exter या एसयूव्ही कारमध्ये इतर कारप्रमाणेच AMT ट्रान्समिशन देण्यात येत आहे. तसेच कारमध्ये पॅडल शिफ्टर्स हे नवीन वैशिष्ट्य देखील देण्यात येत आहे. पॅडल शिफ्टर्ससह येणारी Xeter ही एकमेव AMT कार आहे.

एकाधिक भाषांसाठी समर्थन

या कारमध्ये इंग्रजी व्यतिरिक्त 10 प्रादेशिक भाषांसाठी समर्थनासह एक बहु-भाषा वापरकर्ता इंटरफेस देण्यात आला आहे. त्यामुळे ही एक नवीन परिपूर्ण फीचर्स असलेली कार ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध आहे.