Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Grand i10 : ह्युंदाईच्या या जबदस्त CNG कारच्या प्रतीक्षा कालावधीत वाढ, किंमत फक्त 5.73 लाख, पहा प्रतीक्षा कालावधी

ह्युंदाई मोटर्सची लोकप्रिय आणि स्वस्तातील सीएनजी कार खरेदीसाठी ग्राहकांना आता जास्त दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

0

Hyundai Grand i10 : ह्युंदाई मोटर्सकडून भारतीय ऑटो बाजारात अनेक सीएनजी, पेट्रोल आणि डिझेल कार सादर केल्या आहेत. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना ह्युंदाईकडून आणखी नवीन एसयूव्ही कार सादर केल्या जात आहेत.

ह्युंदाई मोटर्सच्या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. Hyundai Venue, Creta आणि Exeter व्यतिरिक्त, Hyundai Grand i10 Nios ची मागणी देखील सप्टेंबर 2023 मध्ये वेगाने वाढली आहे. ह्युंदाई मोटर्स भारतात सर्वाधिक वाहन विक्री करणारी दुसऱ्या क्रमांकाची कंपनी कार कंपनी आहे. कंपनीकडून आणखी नवीन वाहने सादर करून ह्युंदाई मोटर्स ऑटो क्षेत्रातील विस्तार वाढवत आहे.

भारतीय ऑटो बाजारात ह्युंदाई Grand i10 Nios या सीएनजी कारला प्रचंड मागणी आहे. कारच्या मागणीमध्ये वाढ झाल्याने प्रतीक्षा कालावधीमध्ये देखील वाढ झाली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 5.73 लाख रुपयांपासून सुरू होते. Grand i10 Nios मॉडेलचा प्रतीक्षा कालावधी पूर्वीच्या तुलनेत 5 पटीने वाढली आहे.

किती आठवडे प्रतीक्षा?

ह्युंदाई मोटर्सची स्वस्त सीएनजी कार Grand i10 Nios कार खरेदी करण्याचा विचार असेल तर त्याआधी तुम्हाला कार खरेदीचा प्रतीक्षा कालावधी जाणून घेणे गरजेचे आहे. पेट्रोल व्हेरिएंटचे बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना बुकिंगच्या तारखेपासून 30 आठवडे प्रतीक्षा करावी लागेल. सीएनजी व्हेरियंटसाठी 10 आठवड्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. सीएनजी व्हेरियंटवर मागील महिन्यात 6 आठवड्यांचा प्रतीक्षा कालावधी होता.

वैशिष्ट्ये काय आहेत?

या कारमध्ये चार एअरबॅग्ज, ESS (इलेक्ट्रॉनिक सस्पेंशन सिस्टम), कीलेस एंट्री, एक बर्गलर अलार्म, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, वाहन स्थिरता व्यवस्थापन, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, हिल असिस्ट कंट्रोल, ऑटोमॅटिक हेडलाइट्स अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

इंजिन पॉवरट्रेन

Grand i10 Nios कारमध्ये 1.2-लीटर NA पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल युनिट किंवा AMT युनिटसह जोडलेले आहे. कारचे इंजिन 82bhp पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तर CNG व्हेरिएंट 68bhp पॉवर आणि 95Nm टॉर्क जनरेट करते.