Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Grand i10 Nios : 5 लाखात 28.10 kmpl मायलेज! ह्युंदाईची स्टायलिश कार खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, मिळतेय हजारोंची बंपर सूट

ह्युंदाई मोटर्सची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ३० सप्टेंबरपर्यंत खरेदी करणे योग्य ठरू शकते. कारण कंपनीकडून त्यांच्या कारवर हजारो रुपयांची सूट दिली जात आहे.

0

Hyundai Grand i10 Nios : ऑटो बाजारात सध्या एसयूव्ही कारची क्रेझ असली तरी ह्युंदाई मोटर्सच्या हॅचबॅक कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ह्युंदाईची स्टायलिश हॅचबॅक कार खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. मात्र आता ही कार खरेदीसाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची Grand i10 Nios कार अगदी कमी बजेटमध्ये सादर केली आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी बजेटमध्ये शानदार मायलेज देणाऱ्या हॅचबॅक कारचा पर्याय उपलब्ध झाला आहे. छोट्या कुटुंबासाठी ही कार सर्वोत्तम पर्याय आहे.

नवीन कार खरेदी करत असताना कमी किमतीतील कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. छोट्या हॅचबॅक कार सर्वोत्तम मायलेज आणि उटकसृष्टी फीचर्ससह चांगला परफॉर्मन्स देतात. जर तुम्हालाही Grand i10 Nios कार खरेदी करायची असेल तर आता 24 आठवड्यांचा प्रतीक्षा करावी लागेल.

Hyundai Grand i10 Nios किंमत

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची Grand i10 Nios ही कार अगदी कमी बजेटमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.73 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.51 लाख रुपये आहे.

ही कार एकूण पाच व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. ही कार जर तुम्ही सप्टेंबर महिन्यात कार खरेदी केली तर तुम्हाला कारवर 43,000 रुपयांची सूट दिली जात आहे. बाजारात ही कार टाटा टियागो, मारुती सुझुकी स्विफ्ट आणि रेनॉल्ट क्विडशी स्पर्धा करते.

इंजिन आणि ट्रान्समिशन

Grand i10 Nios कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 83 bhp पॉवर आणि 114 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT ट्रान्समिशनसह जोडण्यात आले आहे. सीएनजी व्हेरियंटमध्ये हे इंजिन 69 bhp पॉवर आणि 95 Nm टॉर्क निर्माण करते. तसेच CNG मध्ये 28.10 kmpl देण्यास सक्षम आहे.

Grand i10 Nios वैशिष्ट्ये

ह्युंदाईकडून त्यांच्या सर्वच कारमध्ये प्रीमियम फीचर्स दिले आहेत. Grand i10 Nios कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि Apple CarPlay सह 8-इंचाचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले, एक वायरलेस फोन चार्जर, रीअर व्हेंटसह ऑटो एसी, क्रूझ कंट्रोल, सहा एअरबॅग, EBD सह ABS, हिल असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि ISOFIX चाइल्ड सीट माउंट अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.