Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai i20 Discount : ह्युंदाईचे ग्राहकांना मोठे दिवाळी गिफ्ट! Hyundai i20 आणि i20 N-Line कारवर मिळतेय हजारोंची बंपर सूट, पहा सविस्तर

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या Hyundai i20 आणि i20 N-Line या दोन कारवर आकर्षक ऑफर देण्यात येत आहे. तुम्हीही या महिन्यात कार खरेदीवर हजारो रुपयांची बचत करू शकता.

0

Hyundai i20 Discount : देशात दिवाळीचा सण सुरु झाला आहे. मोठ्या उत्सवात हा सण साजरा केला जातो. अशातच अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या कार खरेदीवर आकर्षक ऑफर देण्यात येत आहेत. ह्युंदाई मोटर्सने त्यांच्या दोन शानदार कारवर बंपर ऑफर देण्यात येत आहे.

Hyundai i20 आणि i20 N Line अशा या दोन हॅचबॅक कारवर ह्युंदाईकडून बंपर ऑफर देण्यात येत आहे. दिवाळीनिमित्त कंपनीकडून Hyundai i20 वर 30 हजार रुपयांची कॅश डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे.

तसेच i20 N Line हॅचबॅक कारवर 50 हजार रुपयांची सूट देण्यात येत आहे. ऑफरबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर जवळच्या ह्युंदाई डिलरशिपला भेट देऊन माहिती मिळवू शकता.

Hyundai i20 इंजिन

ह्युंदाई Hyundai i20 हॅचबॅक कारमध्ये 1197 cc 1.2L Kappa पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. कारचे इंजिन iVT ऑटोमॅटिक गिरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. हे इंजिन 6000 rpm वर 86.76 bhp पॉवर आणि 4200 rpm वर 114.7 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारची एक्स शोरूम किंमत 6.99 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 11.16 लाख रुपये आहे.

Hyundai i20 डायमेंशन

ह्युंदाई Hyundai i20 कारची लांबी 3995 मिमी, रुंदी 1775 मिमी, उंची 1505 मिमी आहे तर व्हीलबेस 2580 मिमी देण्यात आला आहे. कारमध्ये 351 लिटरची बूट स्पेस देखील देण्यात आली आहे. Hyundai i20 कारला पुढील बाजूस मॅकफर्सन स्ट्रट आणि मागील बाजूस कपल्ड टॉर्शन बीम एक्सल सस्पेन्शनसह देण्यात आले आहे.

Hyundai i20 N-Line इंजिन

Hyundai मोटर्सने अलीकडेच त्यांची i20 N-Line हॅचबॅक कार सादर केली आहे. या कारमध्ये जबरदस्त फीचर्स देखील देण्यात आले आहेत. कारमध्ये 998 cc 1.0 l Turbo GDi पेट्रोल इंजिन दिले गेले आहे जे 6000 rpm वर 118.41 bhp पॉवर आणि 1500-4000 rpm वर 172 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

कारचे इंजिन 7-स्पीड डीसीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची जोडण्यात आले आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 12.47 लाख रुपयांपर्यंत जाते.