Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai i20 Facelift : ह्युंदाई i20 फेसलिफ्ट किती आहे खास? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या 5 महत्वाच्या गोष्टी…

नवीन बदलांसह भारतीय ऑटो बाजारात दाखल झालेली ह्युंदाई i20 फेसलिफ्ट कार खरेदीचा विचार असेल तर त्यामध्ये काय खास फीचर्स मिळत आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

0

Hyundai i20 Facelift : ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची i20 फेसलिफ्ट कार नवीन अपडेटेड फीचर्ससह 8 सप्टेंबर रोजी भारतीय ऑटो बाजारात लॉन्च केलीय आहे. ही कार अगदी कमी बजेटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या कारमध्ये अनेक नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत.

6.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स शोरूम किमतीमध्ये Hyundai i20 फेसलिफ्ट भारतात सादर करण्यात आली आहे. तुम्हीही ही कार खरेदीचा विचार करत असाल तर तुम्ही या कारमध्ये काय काय बदल करण्यात आले आहेत ते जाणून घ्या.

एक्सटेरिअर

कारच्या एक्सटेरिअरमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. आधीच्या मॉडेलच्या तुलनेत येथे तुम्हाला फ्रंट ग्रिलमध्ये बदल दिसेल. कारमध्ये 16 इंची अलॉय व्हील्स नवीन आणि स्पोर्टी लूक देण्यात आला आहे.

इंटेरियर

Hyundai i20 फेसलिफ्ट कारच्या केबिनमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. ड्युअल-टोन ग्रे आणि ब्लॅक एलिमेंट्स कारमध्ये पाहायला मिळेल. तसेच कारमध्ये प्रीमियम BOSE 7-स्पीकर ऑडिओ सिस्टमसह एक प्रगत इन्फोटेनमेंट सिस्टम देखील देण्यात आली आहे. आरामदायी आणि उत्कृष्ट शैलीसाठी कार अर्ध-लेदरट सीट देण्यात आली आहेत. आर्मरेस्ट आणि लेदर-रॅप्ड डी-कट स्टीयरिंग व्हील देखील देण्यात आले आहेत.

रंग आणि व्हेरियंट

Hyundai i20 फेसलिफ्ट कार आठ स्टायलिश रंग पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे. यामध्ये Amazon Grey, Atlas White, Titan Grey, Typhoon Silver, Starry Night, Fire Red, तसेच Atlas White with Black Roof आणि Fire Red with Black Roof चा समावेश आहे. ही कार Era, Magna, Sportz, Asta आणि Asta (O) या चार व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे.

वैशिष्ट्ये

Hyundai i20 फेसलिफ्ट कारमध्ये 60 पेक्षा जास्त कनेक्टेड फीचर्स जोडण्यात आले आहेत. तसेच ही 26 मानक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन (EBD), अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), वाहन स्थिरता व्यवस्थापन (VSM), हिल असिस्ट कंट्रोल (HAC), इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC) अशा वैशिष्ट्यांचा यामध्ये समावेश आहे.