Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai i20 Facelift : ह्युंदाई i20 फेसलिफ्ट भारतात लॉन्च! मिळणार हे अपडेटेड फीचर्स, पहा व्हेरियंट्स आणि त्यांच्या किमती…

ह्युंदाई मोटर्सकडून भारतीय ऑटो बाजारात नवीन फीचर्स आणि बदलांसह त्यांची i20 फेसलिफ्ट कार लॉन्च केली आहे. कारच्या इंजिनमध्ये देखील बदल करण्यात आला आहे.

0

Hyundai i20 Facelift : भारतीय ऑटो क्षेत्रासाठी येणाऱ्या काळ खूप खास ठरणार आहे. कारण पुढील सणासुदीच्या काळात अनेक कंपन्यांच्या कार आणि बाईक्स लॉन्च होणार आहेत. आता ह्युंदाईची i20 फेसलिफ्ट भारतात लॉन्च झाली आहे.

ह्युंदाई i20 फेसलिफ्ट हॅचबॅक कारमध्ये नवीन फीचर्स आणि कॉस्मेटिक बदल पाहायला मिळतात. इंडिया-स्पेक i20 युरोपियन व्हेरिएंट सारखाच दिसत आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.99 लाख रुपये आहे.

2023 Hyundai i20 फेसलिफ्ट डिझाईन

नवीन ह्युंदाई i20 फेसलिफ्ट कारमध्ये नवीन डिझाईन केलेली फ्रंट लोखंडी जाळी आणि बंपर देण्यात आला आहे. कारला एलईडी डेटाइम रनिंग लाइट्ससह त्रिकोणी एलईडी हेडलॅम्प देण्यात आला आहे.

i20 ला सिल्व्हर स्किड प्लेटसह नवीन ड्युअल-टोन बंपर मिळत आहे. तसेच नवीन डिझाईन केलेले 16-इंच अलॉय व्हील देखील देण्यात आले आहे. ह्युंदाई i20 फेसलिफ्ट खूपच आकर्षक बनवण्यात आली आहे.

2023 Hyundai i20 चे फेसलिफ्ट इंटीरियर

नवीन ह्युंदाई i20 फेसलिफ्ट कारमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 4-स्पोक स्टीयरिंग व्हील आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह ड्युअल-टोन इंटिरियर्स देण्यात आले आहे. 7-स्पीकर बोस ऑडिओ सिस्टम, अॅम्बियंट लाइटिंग, TPMS आणि Hyundai च्या BlueLink कनेक्टिव्हिटी Hyundai i20 चे फेसलिफ्टमध्ये देण्यात आली आहे.

2023 Hyundai i20 फेसलिफ्ट इंजिन

Hyundai i20 फेसलिफ्ट कारमध्ये 1.2-लिटर 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 82 bhp पॉवर आणि 115 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा IVT शी जोडलेले आहे. कंपनीकडून या कारमधील 1.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन बंद करण्यात आले आहे.

2023 Hyundai i20 चे फेसलिफ्ट किमती व्हेरियंटनुसार

Era MT – एक्स-शोरूम किंमत 6.99 लाख रुपये

मॅग्ना एमटी – एक्स-शोरूम किंमत 7.70 लाख रुपये

Sportz MT – एक्स-शोरूम किंमत 8.33 लाख रुपये

Sportz IVT – एक्स-शोरूम किंमत 9.38 लाख रुपये

Asta MT – एक्स-शोरूम किंमत 9.29 लाख रुपये

Asta (O) MT – एक्स-शोरूम किंमत 9.98 लाख रुपये

Asta (O) IVT – एक्स-शोरूम किंमत 11.01 लाख रुपये