Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai i20 Facelift : मारुती बलेनोचे टेन्शन वाढले! बाजारात आली ह्युंदाईची 6 एअरबॅग्ससह स्टायलिश कार, किंमतही खूपच कमी…

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची आणखी एक कार नवीन बदलांसह पुन्हा एकदा ऑटो मार्केटमध्ये दाखल केली आहे. त्यामुळे मारुती सुझुकीच्या बलेनो कारचे टेन्शन वाढले आहे.

0

Hyundai i20 Facelift : ह्युंदाई मोटर्सकडून मारुती सुझुकीच्या हॅचबॅक कार बलेनोचे टेन्शन वाढवले आहे. कारण ह्युंदाईने त्यांची लोकप्रिय कार नवीन अपडेट्ससह ऑटो बाजारात पुन्हा एकदा लॉन्च केली आहे. या कारची किंमत देखील खूपच कमी आहे.

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची i20 हॅचबॅक कार पुन्हा एकदा नवीन अवतारात लॉन्च केली आहे. त्यामुळे या कारमध्ये कंपनीकडून अनेक बदल करण्यात आले आहेत. तसेच कारमध्ये नवीन रंग पर्याय देखील देण्यात आला आहे.

Hyundai i20 Facelift किंमत

ह्युंदाई कार उत्पादक कंपनीकडून देखील आता स्वस्त कार सादर केल्या जात आहेत. Hyundai i20 Facelift कार 6.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स शोरूम किमतीमध्ये सादर करण्यात आली आहे. तर या कारच्या टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 11.1 लाख रुपये आहे. ही कार नवीन Amazon ग्रे रंगासह 6 मोनोटोन आणि 2 ड्युअल-टोन रंग पर्यायांसह उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Hyundai i20 इंटीरियर

नवीन ह्युंदाई i20 कारच्या केबिनमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. नवीन ड्युअल टोन ग्रे आणि ब्लॅक इंटीरियर देण्यात आले आहे. नवीन कारमध्ये लेदरेट सीट डिझाइन आणि लेदरेट अॅप्लिकेशन डोअर आर्मरेस्टचा देखील समावेश आहे. कारमध्ये सिग्नेचर LED DRL सह नवीन एलईडी हेडलॅम्प, नवीन फ्रंट आणि रियर बंपर, बोल्ड पॅरामेट्रिक डिझाइन फ्रंट ग्रिल, 16-इंच अलॉय व्हील देखील देण्यात आले आहेत.

नवीन Hyundai i20 कारमध्ये वीन डी-कट स्टीयरिंग व्हील, प्रगत इन्फोटेनमेंट, बोस प्रीमियम 7 स्पीकर सिस्टम आणि सी-टाइप यूएसबी चार्जर पोर्ट देखील दिले आहे. तसेच कारमध्ये प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Hyundai i20 ची सुरक्षा वैशिष्ट्ये

नवीन Hyundai i20 कारमध्ये 40+ प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आहे त्यामधील 26 मानक सुरक्षा वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), हिल असिस्ट कंट्रोल (HAC), व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट (VSM), 3-पॉइंट सीट बेल्ट, अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन (EBD) अशी वैशिष्ट्ये कारमध्ये देण्यात आली आहेत.

Hyundai i20 इंजिन

नवीन Hyundai i20 कारमध्ये 1.2 लिटर काप्पा पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन मॅन्युअल ट्रान्समिशन आणि इंटेलिजेंट व्हेरिएबल ट्रान्समिशन (IVT) पर्यायासह देण्यात आले आहे. ही कार मारुती बलेनो आणि टाटा अल्ट्रोझशी स्पर्धा करेल असा दावा करण्यात येत आहे.