Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Mufasa 2023 : ह्युंदाई मोटर्स करणार धमाका! जबरदस्त लूक आणि शानदार फीचर्ससह लॉन्च करणार नवीन SUV, पहा किंमत

ह्युंदाई मोटर्सकडून लवकरच त्यांची आणखी एक सत्यलिश आणि आकर्षक लूकसह नवीन एसयूव्ही कार सादर केली जाऊ शकते. कारमध्ये अनेक मानक फीचर्स देण्यात आले आहेत.

0

Hyundai Mufasa 2023 : ह्युंदाई मोटर्सकडूनक त्यांच्या अनेक एसयूव्ही कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च केल्या आहेत. तसेच भारतात सध्या एसयूव्ही कारची क्रेझ असल्याने ह्युंदाई मोटर्स आणखी एक स्टायलिश एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे.

ह्युंदाई मोटर्सकडून आगामी काळात त्यांच्या अनेक कार लॉन्च केल्या जाणार आहेत. नवीन लूक आणि शानदार फीचर्ससह ह्युंदाईकडून Mufasa एसयूव्ही कार लॉन्च केली जाणार आहे. जागतिक बाजारपेठेत कंपनीकडून ही कार सादर करण्यात आली आहे.

नवीन ह्युंदाई मुफासा कशी असणार?

ह्युंदाई मोटर्सकडून डिस्नेच्या प्रसिद्ध अॅनिमेटेड फिल्म ‘द लॉयल किंग’ मधील ‘मुफासा’ या पात्रावरून प्रेरीत या कारचे नाव आहे असे सांगितले जात आहे. ही कार प्रथम चिनी मार्केटमध्ये विक्रीसाठी लॉन्च केली जाणार आहे.

ह्युंदाई मोटर्सकडून मुफासा एसयूव्ही कार १५ ते १८ लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमतीमध्ये सादर केली जाऊ शकते. त्यामुळे ग्राहकांना आता आणखी एक स्टायलिश लूक आणि जबरदस्त फीचर्स असलेली एसयूव्ही कार उपलब्ध होणार आहे.

कारमध्ये शार्क फिन अँटेना आणि रूफ रेल्स देण्यात आले आहेत. तसेच कारमध्ये एलईडी टेललॅम्प आणि मागील बाजूस आकर्षक ह्युंदाई बॅजिंग देण्यात आले आहे. तसेच मागील बाजूस पार्किंग सेन्सर देखील देण्यात आले आहेत.

मुफासा एसयूव्ही कार ५ सीटर असणार आहे. कारमध्ये मोठी बूट स्पेस देखील देण्यात आली आहे. कारमध्ये १८ आणि १९ इंच आकर्षक अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. कारमध्ये ५४ लिटर इंधन टाकी देण्यात आली आहे.

मुफासा एसयूव्ही कारमध्ये पॅनारॉमिक सनरूफ आणि नेक्स्ट लेव्हल इंटेरियर देण्यात आले आहे. मोठी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोमेन्ट सिस्टीम कारमध्ये देण्यात देण्यात आली आहे. ऑटोमॅटिक क्लायमेट कन्ट्रोल आणि ऑटो एसी देण्यात आला आहे. ही कार ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायसह सादर करण्यात आली आहे.

मुफासा कारमध्ये ड्रायव्हिंगसाठी तीन मोड देण्यात आले आहेत. इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे ड्राइव्ह मोड कारमध्ये देण्यात आले आहेत. फ्रंट सीटसमध्ये व्हेंटिलेशन देण्यात आले आहे.

कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने ६ एअरबॅग्स, ABS, EBD, ESP आणि फ्रंट आणि रिअरमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. कारमध्ये पुढील बाजूस आकर्षक बंपर देण्यात आला आहे. तसेच फ्रंट एलईडी हेडलॅम्प कारला आणखी आकर्षक बनवत आहे.