Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Staria : Innova, Carnival ची होणार बत्ती गुल! ह्युंदाई लॉन्च करणार लक्झरी फीचर्सने सुसज्ज आलिशान ११ सीटर कार, पहा व्हिडीओ

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची पहिली ११ सीटर कार लवकरच भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च केली जाणार आहे. या कारमध्ये अनेक लक्झरी फीचर्स पाहायला मिळणार आहेत.

0

Hyundai Staria : ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या अनेक लक्झरी फीचर्स कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च केल्या आहेत. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता ह्युंदाई मोटर्सकडून आणखी एक लक्झरी फीचर्स असलेली आलिशान ११ सीटर कार लॉन्च केली जाणार आहे.

दक्षिण कोरियाची कार कंपनी ह्युंदाई मोटर्सकडून या आगामी कारचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. या कारमध्ये अनेक लक्झरी फीचर्स पाहायला मिळत आहेत. ही कार बाजारात दाखल होताच टोयोटा Innova आणि किआ Carnival कारच्या अडचणीत वाढ करू शकते.

ह्युंदाई मोटर्सकडून या काचे नाव Staria ठेवण्यात आले आहे. तुम्ही आतपर्यंत ८ सीटर किंवा १० सीटर कार पाहिली असेल मात्र आता बाजारात ११ सीटर कार लवकरच दाखल होऊ शकते. मल्टी युटिलिटी व्हेईकल (MUV) संकल्पनेवर आधारित ही कार असू शकते.

Staria कारचा लूक एखाद्या मोठ्या व्हॅनसारखा असणार आहे. तसेच कार अधिक आकर्षित आहे. कारमध्ये अनेक नवीन फीचर्स पाहायला मिळू शकतात. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या फॅमिलीसाठी ११ सीटर कारचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

ह्युंदाई Staria कारमध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम दिली जाऊ शकते. तसेच डिजिटल इन्फोमेन्ट क्लस्टर देखील दिला जाणार आहे. कारमध्ये 18 इंच डायमंड कट अलॉय व्हील मिळू शकतात.

ह्युंदाई Staria इंजिन

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या आगामी Staria ११ सीटर कारमध्ये शक्तिशाली इंजिन पर्याय दिला जाणार आहे. २.२ -लीटर डिझेल इंजिन कारमध्ये देण्यात येणार आहे. ही एक सौम्य हायब्रिड कार आहे.

कारमध्ये 8-स्पीड स्वयंचलित ट्रांसमिशन

ह्युंदाई मोटर्सकडून Staria कारमध्ये 8-स्पीड स्वयंचलित ट्रांसमिशन पर्याय दिला जाणार आहे. या कारचे इंजिन 290 PS पॉवर आणि 338 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. २०२४ च्या सुरुवातीला ही कार लॉन्च होण्याचा अंदाज वर्तवणायत येत आहे. कारमध्ये अनेक लक्झरी फीचर्स देण्यात आले आहेत. थायलंडमध्ये ही कार ४० ते ४५ लाख रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.