Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Upcoming Cars : ह्युंदाई मोटर्स करणार धमाका ! बाजारात लॉन्च करणार 4 नवीन कार, पहा यादी

0

Hyundai Upcoming Cars : ह्युंदाई मोटर्सकडून भारतीय ऑटो मार्केटमधील विस्तार वाढवण्यासाठी त्यांच्या नवीन कार लॉन्च करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी नवीन कारचा पर्याय उपलब्ध होणार आहे. देशात कारच्या मागणीत देखील प्रचंड वाढ झाली आहे.

ह्युंदाई मोटर्सकडून कारच्या मागणीतील वाढ लक्षात घेता त्यांच्या नवीन कार लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल- डिझेल कारसह इलेक्ट्रिक कार देखील ह्युंदाई मोटर्सकडून 2024 मध्ये लॉन्च केल्या जाणार आहेत. तुम्हीही नवीन वर्षात ह्युंदाईच्या नवीन कार खरेदी करू शकता.

ह्युंदाई मोटर्स खालील 4 करणार लॉन्च

1. ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट

ह्युंदाई मोटर्स त्यांच्या क्रेटा एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल 16 जानेवारी 2024 रोजी भारतात लॉन्च करणार आहे. क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये अनेक कॉस्मेटिक बदल केले जाणार आहेत. कारमध्ये 1.5L टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन दिले जाईल जे सहा-स्पीड iMT किंवा सात-स्पीड DCT शी जोडलेले असेल.

2. Hyundai Alcazar फेसलिफ्ट

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची 7 सीटर एसयूव्ही Alcazar कारचे फेसलिफ्ट मॉडेल 2024 च्या सुरुवातीला लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. Alcazar कारमध्ये लेव्हल 2 ADAS सुरक्षा फीचर्स दिले जाऊ शकते. तसेच कारच्या फीचर्समध्ये देखील बदल पाहायला मिळू शकतात.

3. ह्युंदाई टक्सन फेसलिफ्ट

ह्युंदाई मोटर्सची टक्सन फेसलिफ्ट एसयूव्ही कार देखील 2024 या नवीन वर्षात लॉन्च केली जाणार आहे. कारच्या डिझाईनमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. कारमध्ये सध्या देण्यात येणारे 2.0L पेट्रोल आणि डिझेल इंजिन कायम ठेवले जाणार आहे.

4. Hyundai Creta EV

ह्युंदाई मोटर्स इलेक्ट्रिक सेगमेंट मजबूत करण्यासाठी त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक कार 2024 मध्ये लॉन्च करणार आहे. लोकप्रिय एसयूव्ही कार क्रेटा देखील लवकरच इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये पाहायला मिळू शकते. क्रेटा EV कारची रस्त्यावर चाचणी घेतली जात आहे. सिंगल चार्जमध्ये ही कार 500 किमी रेंज देण्यास सक्षम असेल.