Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Upcoming Cars : ह्युंदाई मोटर्स यावर्षात लॉन्च करणार 4 नवीन स्टायलिश गाड्या, पहा यादी

0

Hyundai Upcoming Cars : ह्युंदाई मोटर्सकडून भारतीय ऑटो क्षेत्रातील विस्तार वाढवण्यासाठी त्यांच्या आणखी नवीन कार लॉन्च केल्या जाणार आहेत. यामध्ये तीन एसयूव्ही आणि एका सेडान कारचा समावेश असणार आहे.

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची क्रेटा फेसलिफ्ट यावर्षी लॉन्च करण्यात आली आहे. या कारमध्ये अनके मोठे बदल करण्यात आले असून कारचे डिझाईन देखील बदलण्यात आले आहे. क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10.99 लाख रुपये आहे.

ह्युंदाई मोटर्सकडून 2024 यावर्षी त्यांच्या चार नवीन कार लॉन्च केल्या जाणार आहेत. त्यामध्ये तीन नवीन एसयूव्ही आणि एका सेडान कारचा समावेश आहे. अल्काझार फेसलिफ्ट, वेर्ना एन-लाइन, क्रेटा एन-लाइन आणि क्रेटा ईव्ही कारचा यामध्ये समावेश आहे.

ह्युंदाई अल्काझार फेसलिफ्ट

ह्युंदाई मोटर्सकडून यावर्षी अल्काझार फेसलिफ्ट एसयूव्ही कार लॉन्च केली जाणार आहे. या कारमध्ये अनके बदल केले जाणार असून कारमध्ये काही कॉस्मेटिक बदल देखील पाहायला मिळतील.

अल्काझार फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये काही नवीन फीचर्स देखील दिले जाणार आहेत. 2021 मध्ये ह्युंदाईने सर्वात प्रथम Alcazar एसयूव्ही कार लॉन्च केली जाणार आहे. कारमध्ये सध्या देण्यात येणारे इंजिन पर्याय कायम ठेवले जाणार आहेत.

Hyundai Verna N-Line

ह्युंदाई मोटर्सकडून Verna N-Line सेडान कार देखील 2024 मध्ये लाँच केली जाणार आहे. 1.5 लीटर tGDi पेट्रोल इंजिनसह ह्युंदाईने त्यांची Verna कार लाँच केली आहे. हे इंजिन 160 bhp पॉवर आणि 253 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

Verna N-Line सेडान कारमध्ये अनके कॉस्मेटिक बदल केले जातील. तसेच काही फीचर्स देखील कारमध्ये जोडले जाण्याची शक्यता आहे. कारच्या सस्पेंशन सेटअपमध्ये बदलण्याची शक्यता आहे.

Hyundai Creta EV

ह्युंदाई मोटर्सकडून क्रेटा EV एसयूव्ही कार लवकरच भारतात लाँच केली जाणार आहे. ह्युंदाईने IONIQ 5 EVs ही त्यांची एकमेव इलेक्ट्रिक कार भारतात लाँच केली आहे.

आता क्रेटा EV कार ह्युंदाईकडून सादर केली जाणार आहे. क्रेटा EV कारची चाचणी देखील घेण्यात आली आहे. क्रेटा EV कारमध्ये 45 kWh बॅटरी पॅक देण्यात येऊ शकतो.

ह्युंदाई क्रेटा एन-लाइन

ह्युंदाईकडून नुकतीच क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार लाँच करण्यात आली आहे. आता क्रेटा एसयूव्ही कारचे एन-लाइन एसयूव्ही कार 2024 मध्ये लाँच केली जाणार आहे.

या कारचे इंजिन 7-स्पीड DCT गिअरबॉक्सशी जोडण्यात येईल. कारमध्ये देण्यात येणारे इंजिन 160 bhp पॉवर आणि 253 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे.