Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Upcoming Cars : ह्युंदाई मोटर्स करणार धमाका! भारतात लॉन्च करणार लक्झरी फीचर्स 4 आलिशान कार्स, Creta, Verna चाही समावेश

ह्युंदाई मोटर्सकडून भारतीय ऑटो मार्केटमधील विस्तार वाढवण्यासाठी आता कंबर कसल्याचे दिसत आहे. आता ह्युंदाई मोटर्स Creta, Verna सह अनेक कारचे नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे.

0

Hyundai Upcoming Cars : भारतीय ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या शानदार कार लॉन्च होत आहेत. आता ह्युंदाई मोटर्सने देखील कंबर कसल्याचे दिसत आहे. ह्युंदाई मोटर्स २०२४ मध्ये त्यांच्या चार आलिशान लक्झरी फीचर्स कार लॉन्च करणार आहे.

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या काही कारचे अपडेटेड मॉडेल पुन्हा एकदा भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च केले जाणार आहेत. यामध्ये क्रेटा फेसलिफ्ट, अल्काझार फेसलिफ्ट, वेर्ना एन-लाइन आणि कोना ईव्हीसह 4 या कारहा समावेश आहे.

1. ह्युंदाई Creta Facelift

ह्युंदाई मोटर्सची सध्या लोकप्रिय ठरलेली क्रेटा फेसलिफ्ट कार येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा ऑटो बाजारात नव्याने दिसण्याची शक्यता आहे. क्रेटा कारच्या फेसलिफ्ट व्हर्जनची चाचणी करताना ती रस्त्यावर दिसून आली आहे. कारच्या मागील बाजूस कनेक्टेड एलईडी बार दिसून येत आहे. कारमध्ये अनेक बदल केली जाण्याची शक्यता आहे.

पूर्णपणे डिजिटल युनिटमध्ये इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले जाऊ शकते. नवीन क्रेटा एसयूव्ही कार 6-स्पीड मॅन्युअल किंवा CVT शी जोडलेले 1.5-लिटर NA पेट्रोल इंजिन आणि 6-स्पीड मॅन्युअल किंवा 1.5-लिटर डिझेल इंजिनसह बाजारात लॉन्च केली जाऊ शकते. ही कार सध्या Kia Seltos, VW Taigun, Skoda Kushaq, Honda Elevate, Tata Harrier, XUV700 अशा शक्तिशाली एसयूव्ही कारशी स्पर्धा करत आहे.

2. ह्युंदाई अल्काझार फेसलिफ्ट

GaadiWaadi

ह्युंडा मोटर्सची अल्काझार ही ७ सीटर एसयूव्ही कार सध्या बाजारात उपलब्ध आहे. मात्र कंपनीकडून २०२४ मध्ये या कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले जाऊ शकते. सध्या मॉडेलपेक्षा नवीन कारमध्ये अनेक बदल पाहायला मिळू शकतात. मागील बाजूस कनेक्ट केलेले एलईडी टेललाइट्स दिले जाऊ शकतात.

नवीन अल्काझार एसयूव्ही कारमध्ये 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह 6-स्पीड मॅन्युअल किंवा 7-स्पीड DCT आणि 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर युनिटशी जोडलेले 1.5-लीटर टर्बो डिझेल इंजिन दिले जाऊ शकते. ही कार Kia Carens, Maruti Suzuki XL6, MG Hector Plus, Tata Safari, आणि Mahindra XUV700 या ७ सीटर कारशी स्पर्धा करत आहे.

3. Hyundai Verna N-Line

Gaadiwaadi

ह्युंदाई मोटर्सची Verna सेडान कार अलीकडेच नवीन अपडेटसह लॉन्च करण्यात आली आहे. या कारमध्ये डिझाईनसह अनेक बदल करण्यात आले आहेत. मात्र आता पुन्हा एकदा २०२४ मध्ये Verna सेडान कारचे नवीन Verna N-Line मॉडेल सादर केले जाऊ शकते. कारच्या सस्पेन्शनमध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो. सध्या ह्युंदाईकडून त्यांची i20 कार N-Line व्हेरियंटमध्ये लॉन्च केली आहे.

Verna N-line या नवीन सेडान कारला 1.5-लीटर टर्बो पेट्रोल युनिट मिळण्याची शक्यता आहे जे 163bhp पॉवर आणि 253Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल. N-लाइनसाठी 7-स्पीड DCT पर्याय दिला जाऊ शकतो.

4. Hyundai Kona EV

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची Kona EV कार भारतात देखील लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. सध्या ही कार जागतिक बाजारपेठेत विकली जात आहे. कारच्या डिझाईनमध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. लवकरच ही कार भारतात लॉन्च केली जाऊ शकते. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी दोन 12.3-इंच डिस्प्ले आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, 8-स्पीकर बोस साउंड सिस्टम दिले जाऊ शकते.

जागतिक बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या Hyundai Kona 2 इलेक्ट्रिक कारला दोन बॅटरी पॅक देण्यात आले आहेत. भारतात ही कार लॉन्च केल्यांनतर 48.4kWh बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. ही कार 490km रेंज देईल असा दावा करण्यात आला आहे. मात्र कारचे मागील मॉडेल खूपच कमी रेंज देत आहे. सध्या उपलब्ध असलेले या कारचे इलेक्ट्रिक मॉडेल 220 – 250 km रेंज देते.