Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Upcoming Cars : ह्युंदाई भारतात लॉन्च करणार 4 SUV आणि 1 सेडान कार, पहा यादी

ह्युंदाई मोटर्स त्यांच्या ५ नवीन कार भारतात लवकरच लॉन्च करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी नवीन कारचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

0

Hyundai Upcoming Cars : ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या आणखी नवीन कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च केल्या जाणार आहेत. यामध्ये ४ एसयूव्ही आणि १ सेडान कारचा समावेश आहे. एसयूव्ही कारच्या मागणीतील वाढ लक्षात घेता ह्युंदाई मोटर्स ४ एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे.

ह्युंदाई मोटर्स २०२४ या नवीन वर्षात त्यांच्या नवीन कार सादर करू शकते. यातील काही कार चाचणी दरम्यान रस्त्यावर दिसून आल्या आहेत. यामध्ये क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारचा देखील समावेश आहे.

1. ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट

ह्युंदाई मोटर्सची लोकप्रिय एसयूव्ही क्रेटा कारचे फेसलिफ्ट मॉडेल २०२४ मध्ये भारतात लॉन्च होणार आहे. ही कार चाचणी दरम्यान रस्त्यावर दिसून आली आहे. त्यामुळे कारचे काही फीचर्स आणि डिझाईन लीक झाले आहे.

ह्युंदाई मोटर्स त्यांच्या क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये नवीन 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात येईल जे 160 PS आणि 253 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. तसेच कारमध्ये लेव्हल 2 ADAS सुरक्षा फीचर्स देखील दिले जाईल.

2. Hyundai Alcazar फेसलिफ्ट

ह्युंदाई मोटर्सची Alcazar एसयूव्ही कार सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. आता लवकरच कंपनीकडून त्यांच्या Alcazar कारचे फेसलिफ्ट मॉडेल देखील लॉन्च केले जाणार आहे. कारमध्ये ADAS सुरक्षा फीचर्स देखील देण्यात येणार आहे. २०२४ मध्ये Alcazar एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल सादर केले जाऊ शकते.

3. Hyundai Verna N लाइन

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या Verna सेडान कारचे फेसलिफ्ट मॉडेल बाजारात लॉन्च केले आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना आता Verna कारचे N लाइन मॉडेल लॉन्च केले जाणार आहे. कारमध्ये व्हिज्युअल एन्हांसमेंट्स, थ्रोएअर एक्झॉस्ट आणि मजबूत सस्पेंशन सेटअप मिळण्याची शक्यता आहे. ही कार 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन पर्यायासह विकली जाऊ शकते.

4. ह्युंदाई टक्सन फेसलिफ्ट

ह्युंदाई मोटर्सची टक्सन फेसलिफ्ट एसयूव्ही कार देखील २०२४ मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. विद्यमान 2.0L पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह ही कार सहा-स्पीड एटी आणि आठ-स्पीड एटी ट्रान्समिशन आणि पर्यायी 4WD प्रणालीसह कायम ठेवली जाऊ शकते. कारमध्ये कॉस्मेटिक आणि इंटिरियर बदल पाहायला मिळू शकतात.

5. नवीन-Gen Hyundai Kona इलेक्ट्रिक

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची Kona इलेक्ट्रिक कार सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. आता नवीन K3 आर्किटेक्चरवर Kona इलेक्ट्रिक कार विकसित केली जाऊ शकते. नवीन रीजेन ब्रेकिंग सिस्टम आणि V2L फंक्शनसह सादर केली जाऊ शकते. नवीन Kona इलेक्ट्रिक कारमध्ये ट्विन 12.3-इंच स्क्रीन लेआउट पाहायला मिळू शकते.