Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Upcoming Cars : ह्युंदाई लॉन्च करणार Creta, Alcazar SUV चे फेसलिफ्ट मॉडेल! पहिल्यापेक्षा असणार इतके शक्तिशाली

ह्युंदाई मोटर्स त्यांच्या आणखी दोन नवीन एसयूव्ही कार लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. ह्युंदाईकडून या नवीन कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स आणि नवीन इंजिन पर्याय देणार आहे.

0

Hyundai Upcoming Cars : ह्युंदाई मोटर्स लवकरच त्यांच्या आणखी नवीन कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर करणार आहे. यामध्ये क्रेटा आणि Alcazar एसयूव्ही कारच्या फेसलिफ्ट मॉडेलचा देखील समावेश आहे.

ह्युंदाई मोटर्सकडून २०२४ मध्ये त्यांच्या नवीन एसयूव्ही कार लॉन्च करण्यासाठी कंबर कसण्यात आली आहे. ह्युंदाई मोटर्स एसयूव्ही कारच्या मागणीतील वाढ लक्षात घेता त्यांच्या नवीन एसयूव्ही कार लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे.

ह्युंदाई मोटर्सच्या आगामी क्रेटा आणि Alcazar एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल चाचणी दरम्यान दिसून आले आहे. कारच्या डिझाईनपासून फीचर्सपर्यंत अनेक मोठे बदल केल्याचे पाहायला मिळाले आहे.

Hyundai Creta फेसलिफ्ट डिझाइन, इंजिन आणि वैशिष्ट्ये

ह्युंदाई मोटर्सने त्यांच्या क्रेटा फेसलिफ्ट कारच्या डिझाईनमध्ये मोठा बदल केला आहे. कारचा फ्रंट लूक पूणर्पणे बदलण्यात आला आहे. कारच्या हेडलाइट्स, एलईडी डीआरएल आणि ग्रिल डिझाइनमध्ये देखील बदल केला आहे. क्रेटा फेसलिफ्ट कारलं नवीन अलॉय व्हील्सही मिळण्याची शक्यता आहे. तसेच अपडेटेड टेल लॅम्प, रिफ्रेश केलेले टेलगेट डिझाइन आणि नवीन बंपर दिला जाऊ शकतो.

क्रेटा एसयूव्ही कारमध्ये सध्या पेट्रोल आणि डिझेल असे दोन इंजिन पर्याय देण्यात येत आहेत. कारचे 1.4-लीटर टर्बो पेट्रोल इंजिनची जागा नवीन 1.5-लीटर टर्बो इंजिन घेईल असा दावा करण्यात येत आहे.

हे इंजिन 160 Ps ची पॉवर आणि 253 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. नवीन कारचे नवीन इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड DCT ट्रान्समिशनशी जोडलेले असेल. कारचे 1.5-लिटर डिझेल इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह कायम ठेवले जाईल.

क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये ADAS सारखे जबरदस्त सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहे. क्रेटाच्या नवीन मॉडेलमध्ये लेव्हल 2 चे ADAS फीचर्स दिले जाऊ शकते. तसेच कारला जबरदस्त आणखी सिरक्षा फीचर्स जोडली जाण्याची शक्यता आहे.

Hyundai Alcazar फेसलिफ्ट डिझाइन आणि वैशिष्ट्ये

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या Alcazar एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल देखील लवकरच भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर केले जाणार आहे. 2024 मध्ये नवीन Alcazar एसयूव्ही कार भारतात सादर केली जाऊ शकते.

Alcazar फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये पुन्हा डिझाइन केलेले फ्रंट आणि रियर बंपर, नवीन ग्रिल, अपडेटेड हेडलॅम्प, टेललाइट्स आणि नवीन अलॉय व्हील मिळू शकते. तसेच कारमध्ये काही कॉस्मेटिक अपडेट्स बदल देखील आढळू शकतात.

कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ADAS, अपहोल्स्ट्री आणि 360-डिग्री कॅमेरा अशी अनेक मानक वैशिष्ट्ये दिली जाऊ शकतात. सध्या कारमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस चार्जर, 10.25-इंच स्क्रीन, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, TPMS, ब्लूलिंक कनेक्टिव्हिटी असे फीचर्स देण्यात येत आहेत.