Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Venue : 26 Kmpl मायलेज आणि किंमत 8 लाखांपेक्षा कमी! या डॅशिंग SUV मध्ये मिळतात दोन शक्तिशाली इंजिन पर्याय, पहा फीचर्स

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या अनेक शानदार एसयूव्ही भारतीय ऑटो बाजारात सादर केल्या आहेत. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.

0

Hyundai Venue : भारतीय ऑटो बाजारात कॉम्पॅक्ट एसयूव्हीची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांकडून त्यांच्या शानदार नवनवीन एसयूव्ही सादर केल्या जात आहेत. एसयूव्ही कारमध्ये धमाकेदार फीचर्स आणि शक्तिशाली इंजिन दिले जात आहे.

ह्युंदाई मोटर्सच्या अनेक एसयूव्ही कार बाजारात उपलब्ध हेत. या एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या आणखी नवीन एसयूव्ही कार देखील सादर केल्या जात आहेत.

ह्युंदाई मोटर्सच्या Venue या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या एसयूव्ही कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल असे दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. कंपनीने नुकतेच या कारचे नवीन मॉडेल देखील लाँच केले आहे. या एसयूव्ही कारमध्ये धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. मागणीत वाढ झाल्याने ही कार खरेदीचा प्रतीक्षा कालावधी देखील वाढला आहे.

प्रतीक्षा कालावधी किती आहे?

जर तुम्हालाही ह्युंदाई Venue ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार खरेदी करायची असेल तर त्याआधी कारचा प्रतीक्षा कालावधी जाणून घेणे गरजेचे आहे. ही कार खरेदी करण्यासाठी 30 आठवडे म्हणजे सुमारे 5 ते 6 महिने वाट पाहावी लागेल. Venue प्रत्येक व्हेरियंटसाठी हाच प्रतीक्षा कालावधी आहे. आरच्या मागणीत वाढ होत असल्याने प्रत्येक महिन्याला कारचा प्रतीक्षा कालावधी वाढत आहे.

Hyundai Venue किंमत किती आहे?

Hyundai Venue ही एक परवडणारी एसयूव्ही कार आहे. कमी बजेट ग्राहकांसाठी सुरुवातीची कार आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.77 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13.48 लाख रुपये आहे. ही कार Nexon, Kia Sonet आणि मारुती सुझुकी Fronx कारशी स्पर्धा करते.

शक्तिशाली इंजिन आणि उत्कृष्ट मायलेज

Venue कारमध्ये 1.2 लिटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन आणि 1.0 लिटर टर्बो आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन पर्याय दिला जात आहे. ह्युंदाई Venue कार पेट्रोल व्हेरियंटमध्ये 20 ते 22 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. तर डिझेल व्हेरियंटमध्ये ही कार 26 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

Venue वैशिष्ट्य

ह्युंदाई Venue कारमध्ये ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये देखील देण्यात आले आहे. तसेच कारमध्ये इन्फोटेनमेंट सिस्टम, 6 एअरबॅग्ज, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, चाइल्ड लॉक, ABS, EBD, क्लायमेट कंट्रोल एसी, रियर सीट रिक्लिनर आणि आर्मरेस्ट यांसारखी अनेक वैशिष्ट्ये दिली जात आहेत.