Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

दिसायला भारी, मायलेज एक नंबर आणि सेफ्टी पण ! ही आहे Hyundai ची ही जबरदस्त कार ! किंमत फक्त बारा लाख…

0

Hyundai Venue N Line : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आपण अनेकदा नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असतो. मात्र अनेकदा बजेट सेट नसल्यामुळे कार घेणे शक्य होत नाही. मात्र जर तुम्ही सुद्धा दिवाळीमध्ये नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, Hyundai ची Hyundai Venue N Line ही नवीन कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय राहील.

दरम्यान, Hyundai ने नुकतीच Hyundai Venue N Line ही आपली नवीन कार सादर केली असून, अनेक उत्कृष्ट फीचरसह ही कार फक्त 12 लाख ते 14 लाख रुपयांमध्ये तुम्ही घरी आणू शकता.

आपल्याला वेग सहज वाढवता यावा यासाठी इंजिनमध्ये स्पीड गियर बॉक्स देखील देण्यात आला आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या वाहनाचा वेग सहजतेने वाढवू शकता. दरम्यान, याचे इंजिन हे अपग्रेड असल्यामुळे ते E20 इंधनावर चालते. या कार्ला डार्क क्रोम फ्रंट ग्रिल, साइड फेंडर आणि टेल गेट, मुळे ही कार बाहेरून अत्यंत सुंदर दिसते.

दरम्यान ही कार मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक व्हेरियंटमध्ये येते. यामुळे या कारला ट्रॅफिकमध्ये चालवणे अगदी सोपे आहे. या कारला एकूण 6 एअरबॅग देण्यात आल्या आहेत ज्यामुळे तुमची सेफ्टी राहील. दरम्यान, ही कार सध्या पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असल्यामुळे तुम्ही तुमचा आवडीचा कलर निवडू शकता.

या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर 1 लीटर थ्री सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे असल्यामुळे याद्वारे तुम्हाला 118 बीएचपीची पॉवर आणि 172 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो.

याशिवाय यात स्मार्ट कनेक्टिव्हिटी, ड्युअल कॅमेरा डॅश कॅम, गुगल व्हॉईस असिस्टंट यांसारख्या सुविधाही परिपूर्ण अशी ही कार आहे. आपल्या ग्राहकाची सुरक्षा समोर ठेवून चाइल्ड सेफ्टी लॉक, ब्रेक असिस्ट, सेंट्रल लॉकिंग,

ड्रायव्हर एअरबॅग, पॉवर डोअर लॉक, साइड एअरबॅग, रिअल सीट बेल्ट, पॅसेंजर एअरबॅग, अॅडजस्टेबल सीट्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम असे अनके फिचर या कारला मिळणार आहेत.

दरम्यान, अनेक उत्कृष्ट फिचरने समृद्ध असलेली ही कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरते. जर या दिवाळीला तुम्ही ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर Hyundai ची ही कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल.