Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Verna : ह्युंदाईची लोकप्रिय Verna कार खरेदीसाठी करावी लागणार इतक्या दिवसांची प्रतीक्षा, कमी किमतीत मिळतात उत्कृष्ट फीचर्स

ह्युंदाईची लोकप्रिय सेडान Verna कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला त्याआधी कार खरेदी करण्यासाठी किती दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे हे जाणून घ्यावे लागेल.

0

Hyundai Verna : ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची शानदार Verna सेडान कारचे फेसलिफ्ट मॉडेल गेल्या काही दिवसांपूर्वी बाजारात सादर केले आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्हीही ही सेडान कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी कार खरेदी करण्यासाठी किती दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल हे जाणून घ्या.

ह्युंदाई मोटर्सकडून Verna सेडान कार 10.96 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमतीमध्ये सादर केली आहे. या कारमध्ये उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच कारमध्ये शक्तिशाली इंजिन बसवण्यात आले आहे. Verna फेसलिफ्ट कारचा लूक देखील बदलण्यात आला आहे.

ह्युंदाई मोटर्सकडून Verna कार पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. तुम्हालाही ही कार खरेदी कारसायही असेल तर तुमच्यासाठी प्रतीक्षा कालावधी जाणून घेणे गरजेचे आहे. ह्युंदाई Verna कार खरेदी करण्यासाठी 30 आठवडे लागू लागू शकतात.

Verna कारसाठी प्रतीक्षा कालावधी 30 आठवड्यांपर्यंत

Hyundai Verna कार खरेदीचा प्रतीक्षा कालावधी 30 आठवड्यांपर्यंत प्रतीक्षा कालावधी आहे. ही कार EX, S, SX आणि SX(O) या व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने कारच्या प्रतीक्षा कालावधीत देखील वाढ होत आहे.

Hyundai Verna इंजिन

ह्युंदाई मोटर्सकडून Verna सेडान कारमध्ये 1.2-लिटर चार-सिलेंडर, NA पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 113bhp पॉवर आउटपुट आणि 144Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल युनिट आणि IVT युनिटसह जोडलेले आहे.

Verna कारमध्ये दुसरे 1.5-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 158bhp आणि 253Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल युनिट किंवा 7-स्पीड DCT युनिटशी जोडण्यात आले आहे.

Hyundai Verna 65 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्ये


ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या Verna कारमध्ये 65 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत. कारमध्ये 6 एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) विथ इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), VSM, ट्रॅक्शन कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स अशी वैशिष्ट्ये दिली आहेत.

तसेच 8-स्पीकर बोस प्रीमियम ऑडिओ सिस्टम, तीन ड्राइव्ह मोड – इको, नॉर्मल आणि स्पोर्ट, हवेशीर फ्रंट सीट्स, इलेक्ट्रिक सनरूफ, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, एलईडी हेडलाइट्स असे फीचर्स देखील देण्यात आले आहेत.