Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Verna : ह्युंदाईच्या या लक्झरी कारमध्ये मिळते 528 लीटरची मोठी बूट स्पेस आणि 19 Kmpl मायलेज, किंमतही खूपच कमी…

ह्युंदाईची लक्झरी सेडान कार सध्या बाजारात वर्चस्व गाजवता आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ह्युंदाईची ही सेडान कार 19 Kmpl मायलेज देते.

0

Hyundai Verna : ऑटो बाजारात एसयूव्ही कारची मागणी असली तरी काही सेडान कारची आजही ग्राहकांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. ह्युंदाई आणि मारुती सुझुकीच्या सेडान कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तुम्हीही मिड सेगमेंट फॅमिली सेडान कार शोधत असाल तर ह्युंदाई Verna कार उत्तम पर्याय आहे. ही कार मायलेजच्या बाबतीत देखील दमदार आहे. तसेच सुरक्षेसाठी कारमध्ये 6 एअरबॅग आणि इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण देण्यात येत आहे.

10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम

ह्युंदाई Verna या सेडान कारमध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात येत आहे. कारमध्ये डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. ही कार १९ Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. ही सेडान कार मारुती सियाझशी स्पर्धा करते. ह्युंदाई Verna सेडान कारमध्ये अनेक रंग पर्याय ऑफर करण्यात आले आहेत.

1.5-लिटर पेट्रोल इंजिन

ह्युंदाई Verna कारमध्ये 1.5-लिटर 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 114 Nm टॉर्क जनरेट करते. कारमध्ये हिल स्टार्ट असिस्ट, एबीएस आणि 528 लीटरची बूट स्पेस देखील देण्यात आली आहे.

कारची लांबी 1765 मिमी आणि व्हीलबेस 2670 मिमी देण्यात आला आहे. ह्युंदाई Verna कासारखे ४ व्हेरियंट सध्या बाजारात उपलब्ध आहेत. EX, S, SX आणि SX (O) अशी व्हेरियंट सध्या ग्राहक खरेदी करू शकतात.

कारमध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक देण्यात आले आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10.89 लाख रुपये आहे. कमी बजेटमध्ये तुम्हाला या कारमध्ये लक्झरी फीचर्स मिळत आहेत.

ह्युंदाई Verna कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय देण्यात आला आहे. वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड सिस्टम आहे. कारमध्ये 8-स्पीकर साउंड सिस्टम आणि टच-आधारित क्लायमेट कंट्रोल सिस्टम देण्यात आली आहे. तसेच कारमध्ये एसी फ्रंट सीट्स, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स देखील देण्यात आले आहेत.