Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

i20 vs Baleno vs Altroz : नवीन i20, Baleno की Altroz… कोणती आहे बेस्ट हॅचबॅक कार? जाणून घ्या किमतीसह सर्वकाही…

ह्युंदाई i20, मारुती बलेनो आणि टाटा अल्ट्रोझ यापैकी कोणतीही हॅचबॅक कार खरेदी करण्यापूर्वी तीनही कारबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. या तीनही कारच्या किमती देखील वेगवेगळ्या आहेत.

0

i20 vs Baleno vs : ह्युंदाई मोटर्सकडून अलीकडेच त्यांच्या हॅचबॅक कारचे अपडेटेड मॉडेल लॉन्च केले आहे. या कारची थेट स्पर्धा टाटा मोटर्सच्या अल्ट्रोझ आणि मारुती सुझुकीच्या बलेनो कारशी होत आहे. त्यामुळे जर तुम्हाला या तीनपैकी कोणती कार खरेदी करायची असेल तर त्याबद्दल सर्वकाही माहिती असणे आवश्यक आहे.

कारचे डाइमेंशन

ह्युंदाई मोटर्सकडून लॉन्च करण्यात आलेल्या नवीन i20 कारची लांबी 3995 मिमी, रुंदी 1775 मिमी, उंची 1505 मिमी आणि व्हीलबेस 2580 मिमी लांब देण्यात आला आहे. ही कार मारुती बलेनो आणि टाटा अल्ट्रोझ कारपेक्षा थोडी लांब आणि रुंद आहे.

मारुती सुझुकीच्या हॅचबॅक कार बलेनो कारची लांबी 3990 मिमी, रुंदी 1745 मिमी आणि व्हीलबेस 2520 मिमी देण्यात आला आहे. तर टाटा अल्ट्रोझ कारची लांबी 3990 मिमी, रुंदी 1755 मिमी आणि व्हीलबेस 2501 मिमी लांब आहे. तसेच या तीनही कारमध्ये 300 लीटरपेक्षा जास्त बूट स्पेस देण्यात आला आहे.

इंजिन आणि पॉवरट्रेन

ह्युंदाई कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या Hyundai i20 कारमध्ये 1.2-लिटर चार-सिलेंडर NA पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. कारचे हे इंजिन 82 hp पॉवर आणि 115 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. Hyundai i20 च्या N Line या मॉडेलमध्ये 1.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. कारच्या इंजिनला 5-स्पीड एमटी आणि सीव्हीटी गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे.

मारुती सुझुकी बलेनो आणि टाटा अल्ट्रोझ कारमध्ये 1.2-लीटर NA पेट्रोल इंजिन देण्यात येते. या दोन्ही कारमध्ये कंपन्यांकडून सीएनजी पर्याय देखील ऑफर करण्यात आला आहे. मात्र Altroz ​​ला iTurbo मध्ये 1.5-लीटर डिझेल इंजिन देण्यात येते जे 89 HP पॉवर आणि 200 Nm टॉर्क जनरेट करते. तसेच 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्याय देखील मिळतो.

किंमत

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या i20 फेसलिफ्टची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 11.01 लाख रुपये आहे. टाटा मोटर्स अल्ट्रोझ कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6.60 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.74 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी बलेनो कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6.61 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.88 लाख रुपये आहे. या तीनही कारमध्ये एकसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. मारुती सुझुकी बलेनो कारमध्ये फक्त इलेक्ट्रिक सनरूफचा पर्याय देण्यात आलेला नाही.