Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Innova Hycross Waiting Period : टोयोटाची आलिशान इनोव्हा हायक्रॉस खरेदीसाठी करावी लागणार इतकी प्रतीक्षा, मिळतात लक्झरी फीचर्स

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस कार खरेदी करायची असेल तर त्याआधी तुम्हाला कारवरील नवीन प्रतीक्षा कालावधी जाणून घ्यावा लागेल. कारमध्ये लक्झरी फीचर्स आणि हायब्रीड इंजिन देण्यात आले आहे.

0

Innova Hycross Waiting Period : टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या अनेक आलिशान कार सध्या भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. त्यांच्या या लक्झरी फीचर्स कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र ग्राहकांना टोयोटाच्या कार खरेदीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

टोयोटा कार उत्पादक कंपनीच्या कारच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्याने ग्राहकांना टोयोटा कार खरेदीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

तुम्हालाही टोयोटाची आलिशान इनोव्हा हायक्रॉस कार खरेदी करायची असेल तर त्याआधी कारवरील प्रतीक्षा कालावधी जाणून घ्यावा लागेल. टोयोटाने त्यांच्या कारवरील नोव्हेंबर २०२३ मधील प्रतीक्षा कालावधी जाहीर केला आहे.

टोयोटाची इनोव्हा हायक्रॉस कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आता 18 महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. या कारचा प्रतीक्षा कालावधी आगोदर १२ महिन्यांपर्यंत होता. मात्र आता त्यामध्ये वाढ झाली आहे.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस

टोयोटाकडून नेहमीच त्यांच्या कारमध्ये लक्झरी फीचर्स दिले जात आहेत. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 25.30 लाख रुपयेरुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 29.62 लाख रुपये आहे.

कारमध्ये सुरक्षेसाठी 6 एअरबॅगसह ADAS सारखे जबरदस्त सुरक्षा वैशिष्ट्ये दिले आहे. या कारमध्ये पेट्रोल इंजिनसोबत हायब्रीड इंजिन पर्याय देखील दिला आहे. सध्या इनोव्हा हायक्रॉस कार ५ व्हेरियंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस वैशिष्ट्ये

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस MPV कारमध्ये जबरदस्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कारमध्ये 7-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले, ड्युअल 10-इंच रीअर टचस्क्रीन सिस्टम, ADAS वैशिष्ट्ये, अॅम्बियंट लाइटिंग, JBL साउंड सिस्टम, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, अॅडजस्टेबल कॅप्टन सीट्स, सनरूफ अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस इंजिन

टोयोटाकडून इनोव्हा हायक्रॉस कारमध्ये 2.0 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे जे 174 PS ची पॉवर आणि 205 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन CVT गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.

तसेच यामध्ये 2.0 लीटर मजबूत हायब्रिड इंजिन देखील दिले आहे जे 113 PS मोटरसह 152 PS ची पॉवर आणि 187 Nm चा टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही कार 21.1 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.