Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Jimny Thunder Edition : मारुतीच्या डॅशिंग SUV चे Thunder Edition लॉन्च ! मिळाले हे नवीन फीचर्स, किंमतही झाली कमी

0

Jimny Thunder Edition : मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून भारतीय ऑटो क्षेत्रातील विस्तार वाढवण्यासाठी त्यांच्या नवनवीन कार सादर केल्या जात आहेत. त्यांच्या या कारला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मारुती सुझुकीने त्यांच्या जिमनी ऑफ रोडींग एसयूव्ही कारचे Thunder Edition लॉन्च केले आहे.

मारुतीने 1 डिसेंबरला त्यांच्या जिमनी एसयूव्हीचे Thunder Edition भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च केले आहे. आता जिमनी एसयूव्हीचे Thunder Edition डिलरशीपर्यंत पोहचु लागले आहे. या कारची किंमत कंपनीकडून कमी करण्यात आली आहे.

मारुती जिमनी Thunder Edition पाहण्यासाठी ग्राहकांनी शोरूममध्ये गर्दी केली आहे. जिमनी एसयूव्ही कारच्या Thunder Edition ची एक्स शोरूम किंमत 10.74 लाख रुपये आहे.

तर जिमनीच्या पहिल्या व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 12.74 लाख रुपये आहे. तसेच कंपनीकडून कारवर 2 लाख रुपयांची ऑफर देखील देण्यात येत आहे.

जिमनी थंडर एडिशनमध्ये वेगळे काय?

मारुती सुझुकीच्या पहिल्या जिमनी एसयूव्हीपेक्षा नवीन थंडर एडिशनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. समोरचे बंपर गार्निश, फ्रंट स्किड प्लेट, साइड डोअर क्लॅडिंग, डोअर व्हिझर, इल्युमिनेटेड डोअर सिल गार्ड, ORVM गार्निश आणि साइड फेंडर गार्निश हे बाकी व्हेरियंटपेक्षा वेगळे आहे.

रूफ रेल, आणि टेलगेट-माउंट केलेले स्पेअर व्हील नवीन जिमनी थंडर एडिशनमध्ये पाहायला मिळत आहे. थंडर एडिशन अल्फा व्हेरियंटमध्ये 15-इंच आकर्षक अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. कारला आणखी आकर्षक लूक देण्यासाठी अनेक बदल करण्यात आले आहेत.

जिमनी थंडर एडिशन व्हेरिएंट किंमती

जिमनी थंडर एडिशनमध्ये कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. जिमनी थंडर एडिशन एंट्री-लेव्हल झेटा आणि अल्फा या दोन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे.

थंडर एडिशन Zeta AT व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 11.94 लाख रुपये, Alpha MT व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 12.69 लाख रुपये, Alpha MT DT व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 12.85 लाख रुपये, Alpha AT व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 13.89 लाख रुपये आणि Alpha AT DC ची एक्स शोरूम किंमत 14.05 लाख रुपये आहे.

जिमनी सुरक्षा वैशिष्ट्ये

जिमनी एसयूव्ही कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्टँडर्ड ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, साइड आणि कर्टन एअरबॅग्ज, ब्रेक लिमिटेड स्लिप डिफरेंशियल, ईबीडीसह अँटी-लॉक ब्रेक्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, साइड-इम्पॅक्ट डोअर बीम असे मानक फीचर्स दिले आहेत.

मारुती जिमनी वैशिष्ट्ये

मारुती सुझुकी जिमनी एसयूव्ही कारमध्ये प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. ही कार ऑटो मार्केटमध्ये महिंद्रा थार एसयूव्ही कारशी स्पर्धा करते. जिमनी कारमध्ये इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ओआरव्हीएम, वॉशरसह फ्रंट आणि रिअर वायपर्स, डे अँड नाईट IRVM, ड्रायव्हर-साइड पॉवर विंडो ऑटो अप/डाउन विथ पिंच गार्ड, रिक्लिनिंग फ्रंट सीट्स, माउंटेड कंट्रोल्ससह मल्टीफंक्शनल स्टिअरिंग व्हील, TFT कलर डिस्प्ले अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

जिमनी थंडर एडिशन इंजिन

मारुती सुझुकी जिमनी थंडर एडिशन एसयूव्ही कारमध्ये 1.5-लिटर चार-सिलेंडर K15B सौम्य-हायब्रिड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 105 hp पॉवर आणि 134 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 5-स्पीड AMT किंवा 4-स्पीड AT गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.