Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Kia Carens X-Line : Toyota Rumion चं वाढलं टेन्शन! बाजारात लाँच झाली Kia ची नवीन SUV, किंमत आहे फक्त…

Kia ची नवीन कार लाँच झाली असून तुम्ही ती शानदार फीचर्स आणि शक्तिशाली इंजिनसह खरेदी करू शकता.

0

Kia Carens X-Line : भारतीय बाजारात आता कियाची शानदार SUV लाँच झाली आहे. जी थेट बाजारातील Toyota Rumion ला टक्कर देते. या कारच्या इंजिनला 7-स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळतात. ही कंपनीची लक्झरी कार आहे. जाणून घ्या Kia च्या नवीन कारची फीचर्स आणि किंमत.

जाणून घ्या किंमत

कंपनीने आता Kia Carens दोन प्रकारांसह सादर केली असून पहिला प्रकार पेट्रोल डीसीटी आणि दुसरा प्रकार डिझेल 6 स्पीड ऑटोमॅटिक हा आहे. किमतीचा विचार केला तर पेट्रोल डीसीटीच्या पहिल्या व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 18.94 लाख रुपये आणि डिझेल 6-स्पीड ऑटोमॅटिकची किंमत 19.44 लाख रुपये इतकी आहे.

असा असेल लूक

कंपनीच्या नवीन Carens X-Line ला मॅट ग्रेफाइट फिनिश, सिल्व्हर कॅलिपर्स, क्रोम ग्रिल गार्निश, ग्लॉसी ब्लॅक ग्रिल, फ्रंट आणि रियर बंपर गार्निश, इंच अलॉय व्हील्स ड्युअल-टोनमध्ये डिझाइन करण्यात आले आहेत, हे अपडेट्स एक्सटीरियरमध्ये मिळाल्यानंतर, कॅरेन्स पूर्वीपेक्षा जास्त आकर्षक दिसत आहे.

आतील भाग

बाह्य भागाप्रमाणेच, Kia ने आतील भागातही मोठे बदल केले असून Carens X-Line ला सेज ग्रीन तसेच ब्लॅक इंटीरियर, ट्रिम्स आणि रूफ अस्तर काळ्या रंगात असणार आहे. इतकेच नही तर सीट्स आणि आर्मरेस्ट्सवर नारिंगी स्टिचिंगसह सेज ग्रीन आणि सिल्व्हर डोर हँडल देण्यात आले आहे.

जाणून घ्या पॉवरट्रेन

मेकॅनिकल अपडेट्सबद्दल सांगायचे झाले तर कंपनीने Kia Carens च्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. यामध्ये डीसीटी गिअरबॉक्ससह पेट्रोल आणि डिझेल इंजिनचा समान पर्याय आणि डिझेल आवृत्तीमध्ये ऑटोमॅटिक ट्रांसमिशन मिळेल. हे लक्षात घ्या की MPV सेगमेंटमध्ये, Kia Carens लोकप्रिय Toyota Rumion, मारुती सुझुकी Ertiga, XL6, आणि Hyundai Alcazar ला टक्कर देते.