Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Kia Carnival 2024 : किआ 2024 मध्ये लॉन्च करणार कार्निवल फेसलिफ्ट! मिळणार हे खास फीचर्स

किआ कार कंपनीकडून त्यांची कार्निवल फेसलिफ्ट कार भारतात लवकरच लॉन्च केली जाणारा आहे. कारमध्ये अनेक नवीन बदल पाहायला मिळतील.

0

Kia Carnival 2024 : किआ कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या अनेक नवीन कार २०२४ मध्ये लॉन्च केल्या जाणार आहेत. भारतीय ऑटो मार्केटमधील विस्तार वाढवण्यासाठी किआ त्यांच्या नवीन कार सादर करत आहे. २०२४ मध्ये किआकडून त्यांची कार्निवल फेसलिफ्ट कार लॉन्च केली जाणार आहे.

किआच्या नवीन २०२४ मध्ये लॉन्च होणाऱ्या कार्निवल कारचे काही फीचर्स लीक झाले आहेत. कारमध्ये कंपनीकडून लक्झरी फीचर्स जोडले जाणार आहेत. मोठ्या फॅमिली असणाऱ्या ग्राहकांना ही एक उत्तम कार असणार आहे.

भारतात कधी होणार लॉन्च

किआ कार उत्पादक कंपनीकडून त्यांची कार्निवल फेसलिफ्ट कार ग्लोबल मार्केटमध्ये सादर केली आहे. २०२४ मध्ये ही कार भारतात देखील लॉन्च होऊ शकते. तसेच किआकडून त्यांची sonet फेसलिफ्ट कार देखील लवकरच लॉन्च केली जाईल. ही कार चाचणी दरम्यान स्पॉट झाली आहे.

नवीन डिझाइन

किआ कार्निवल कारमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत. कारच्या डिझाईनमध्ये देखील बदल पाहायला मिळू शकतो. क्रोम स्लॅट्ससह अधिक प्रमुख ग्रिल विभाग, नवीन एलईडी डीआरएलसह एल-आकाराचे एलईडी हेडलॅम्प, नवीन एअर इनलेटसह सुधारित बंपर आणि खालच्या भागात फॉक्स ब्रश केलेली अॅल्युमिनियम स्किड प्लेट, एलईडीद्वारे जोडलेले नवीन एलईडी टेललाईट कारमध्ये पाहायला मिळेल. तसेच 19-इंच अलॉय व्हील कारचा लूक आणखी आकर्षक बनवले.

नवीन इंटीरियर आणि वैशिष्ट्ये

किआ कार्निव्हल २०२४ कारमध्ये ११ सीटर पर्याय दिला जाऊ शकतो. नवीन कार्निव्हल कारमध्ये नवीन वक्र डिस्प्ले आहे ज्यामध्ये ट्विन 12.3-इंच स्क्रीन, एक इन्फोटेनमेंटसाठी आणि दुसरा इन्स्ट्रुमेंटेशनसाठी दिली जाईल. तसेच सुरक्षेसाठी आठ एअरबॅग्ज, ADAS फीचर्स दिले जाईल.

किआ कार्निव्हल २०२४ इंजिन

किआकडून कार्निव्हल फेसलिफ्ट कारमध्ये जागतिक बाजारपेठेत 3.5L पेट्रोल आणि 1.6L पेट्रोल/हायब्रिड इंजिन दिले गेले आहे. भारतात ही 2.2L चार-सिलेंडर टर्बो डिझेल इंजिनसह सादर केली जाऊ शकते. हे इंजिन 200 PS पॉवर आणि 440 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असू शकते. हे इंजिन आठ-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले असू शकते.