Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Kia Seltos 7 Seater : टाटा, महिंद्राचे टेन्शन वाढणार! किआ लॉन्च करणार Seltos 7 सीटर, मिळणार प्रीमियम फीचर्स

किआ कार कंपनीकडून त्यांच्या लोकप्रिय Seltos कारचे ७ सीटर मॉडेल लॉन्च केले जाणार आहे. कारमध्ये जबरदस्त फीचर्स आणि शक्तिशाली इंजिन दिले जाणार आहे.

0

Kia Seltos 7 Seater : किआ कार उत्पादक कंपनीकडून त्यांचा भारतीय ऑटो मार्केटमधील विस्तार वाढवण्यासाठी नवनवीन कार सादर करत आहे. आता ७ सीटर कारची वाढती मागणी लक्षात घेता किआ त्यांची आणखी एक ७ सीटर कार लॉन्च करू शकते.

किआने अलीकडेच भारतीय ऑटो मार्केटमध्ये त्यांची Seltos फेसलिफ्ट कार लॉन्च केली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारमध्ये जबरदस्त फीचर्स दिले गेले आहेत.

किआ कार निर्मात्या कंपनीकडून त्यांची Seltos SUV कार ७ सीटर सेगमेंटमध्ये लॉन्च करू शकते. कंपनीकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या Seltos SUV कारचे ५ सीटर मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहे.

किआने Seltos एसयूव्ही कार ग्राहकांना अगदी कमी बजेटमध्ये उपलब्ध करून दिली आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.90 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 20.30 लाख रुपये आहे.

Seltos ७ सीटरमध्ये शक्तिशाली इंजिन दिले जाऊ शकते

किआकडून त्यांच्या ७ सीटर एसयूव्ही कारमध्ये 1.5 लीटर डिझेल इंजिन आणि 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. ही दोन्ही इंजिन 159 Ps पॉवर आणि 205 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असू शकतात. सध्या किआ Seltos सीटर कारमध्ये देण्यात आलेले ट्रान्समिशन पर्याय आगामी ७ सीटर Seltos मध्ये दिसू शकतात.

कशी असेल Seltos ७ सीटर

नवीन किआ Seltos ७ सीटर कारच्या डायमेंशनमध्ये बदल केले जाऊ शकतो. कारचे डिझाईन सध्याच्या Seltos फेसलिफ्ट कारसारखे असू शकते. थोडेफार कॉस्मेटिक बदल आगामी ७ सीटर कारमध्ये केले जाऊ शकतात.

७ सीटर Seltos वैशिष्ट्ये आणि किंमत

७ सीटर Seltos कारमध्ये उत्तम डॅशबोर्ड, मोठी स्क्रीन, वायरलेस कनेक्टिव्हिटी, आरामदायी सीट्स, ऑटोमॅटिक एसी, 360 डिग्री कॅमेरा, प्रीमियम स्टिरिओ सिस्टम, एअर प्युरिफायर, पॅनोरॅमिक सनरूफ अशी वैशिष्ट्ये देण्यात येतील. पुढील वर्षी २०२४ मध्ये ही कार लॉन्च केली जाण्याची अपेक्षा आहे. कारची किंमत १५ लाखांपेक्षा जास्त असू शकते.