Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Kia Seltos Facelift : कार खरेदीचे स्वप्न होईल पूर्ण! अवघ्या 2.60 लाख रुपयांमध्ये घरी आणा Seltos फेसलिफ्ट, मिळतात लक्झरी फीचर्स

तुम्हालाही नवीन कार खरेदी करायची असेल आणि बजेट कमी असेल तर अवघ्या 2.60 लाख रुपयांमध्ये Seltos Facelift कार खरेदी करू शकता.

0

Kia Seltos Facelift : किआ कार उत्पादक कंपनीकडून भारतीय ऑटो मार्केटमध्ये अलीकडेच Seltos कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले आहे. या कार्ल ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या एका महिन्यात या कारचे रेकॉर्ड ब्रेकिंग बुकिंग झाले आहे.

Seltos फेसलिफ्ट कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.89 लाख रुपये आहे. तसेच या कारच्या टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 19.99 लाख रुपयांपर्यंत जाते. कारमध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत.

1.5 लीटर NA पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन कारमध्ये देण्यात आले आहे. तुमचेही बजेट कमी असेल तर टेन्शन घेऊ नका. तुम्हीही ही कार अगदी 2.60 लाख रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

2023 Kia Seltos EMI, कर्ज

किआ Seltos फेसलिफ्ट कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि बजेट कमी पडत असेल तर काळजी करू नका. एक्स-शोरूम किंमत 10.89 लाख रुपये आहे. 1,49,987 रुपये आरटीओ चार्ज, सुमारे 51,225 रुपये, इन्शुरन्स आणि टॅक्स आणि फास्टॅगसह इतर शुल्क भरावे लागतील आणि 18,799 रुपये भरावे लागतील. या कारची ऑन रोड किंमत 14,19,911 रुपये होईल.

तुम्ही 2,66,000 लाख रुपयांचे डाउन पेमेंट भरून तुम्हाला या कारवर 9,93,270 रुपये कर्ज घ्यावे लागेल. बँकेकडून तुम्हाला कारसाठी दिलेल्या कर्जावर वार्षिक ९.८ टक्के व्याज आकारले जाईल. ५ वर्षासाठी दरमहा तुम्हाला २१,००६ रुपयांचा EMI भरावा लागेल.

2023 किआ सेल्टोस इंजिन आणि वैशिष्ट्ये

किआ सेल्टोस फेसलिफ्ट कारमध्ये 4.2 इंच कलर टीएफटी, सी-टाइप यूएसबी चार्जर, टिल्ट स्टीयरिंग व्हील, गियर शिफ्ट इंडिकेटर, चारही पॉवर विंडो, हेडलॅम्प एस्कॉर्ट फंक्शन, सनग्लासेस होल्डर असलेले डिजिटल क्लस्टर देण्यात आले आहे.

सनशेड स्क्रीन, ड्रायव्हर सीटची उंची कमी जास्त करणे, सीट बेल्ट उंची समायोजन आणि मागील एसी व्हेंट्स, हॅलोजन प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, कव्हर्ससह 16-इंच स्टील व्हील, फॅब्रिक सीट्स, फ्रंट मॅप लॅम्प, मागील खोलीचा दिवा, शार्क फिन अँटेना, हाय मोंट एस. अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.