Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Kia Seltos Facelift : Kia Seltos चा नवीन अवतार समोर! या दिवशी भारतात होणार लॉन्च, पहा नवीन वैशिष्ट्ये

भारतीय बाजारपेठेत लवकरच Kia Seltos Facelift लॉन्च केली जाणार आहे. या कारमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये कंपनीकडून देण्यात येणार आहेत. त्यामुळे परिपूर्ण फीचर्स असलेली SUV तुम्हाला खरेदी करता येणार आहे.

0

Kia Seltos Facelift : दक्षिण कोरियाची कार निर्माता कंपनी Kia कडून आगोदरच भारतीय ऑटो बाजारात Kia Seltos कार लॉन्च करण्यात आली आहे. तसेच या कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता कंपनीकडून काही बदलांसह पुन्हा एकदा Kia Seltos लॉन्च करण्यात येणार आहे.

कंपनीकडून Kia Seltos Facelift चा टीझर व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. ही कार भारतमध्ये ४ जुलै रोजी भारतामध्ये लॉन्च होणार आहे. Kia ने भारतीय बाजारपेठेत त्यांची पहिली SUV 2019 मध्ये लॉन्च केली होती.

Kia Seltos Facelift मध्ये कंपनीकडून इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या कारमध्ये कंपनीकडून 1.5 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे. तसेच हे इंजिन 115hp पॉवर आणि 144Nm टॉर्क जनरेट करते.

तसेच या कारमध्ये 1.5 लीटर डिझेल इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 116hp पॉवर आणि 250Nm टॉर्क जनरेट करते. चला तर जाणून घेऊया Kia Seltos Facelift मध्ये काय बदल करण्यात आले आहेत.

1. नवीन DRL आणि टेल लॅम्प

Kia Seltos मध्ये, नवीन डिझाइन केलेले हेडलॅम्प, LED डेटाइम रनिंग लाइट्स आणि नवीन अलॉय व्हील ग्रिलमध्ये देण्यात आले आहेत. कारमध्ये मागील बाजूस बदल करण्यात आले आहेत. यात नवीन टेल-लॅम्प सेट मिळतील जे एलईडी लाइटबारमध्ये जोडण्यात आले आहे.

2- ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल

कंपनीकडून कारमध्ये एक नवीन फीचर्स देण्यात आले आहे. कारमध्ये ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल फीचर्स देण्यात आले आहे. सेल्टोस फेसलिफ्ट ही पहिली ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल मध्यम आकाराची SUV असेल.

तापमान सेट करण्यासाठी कंपनीकडून बटन्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, किआने सेंट्रल एसी व्हेंट्सच्या दरम्यान लावलेल्या धोक्याच्या प्रकाशाच्या स्विचचीही पुनर्रचना केली आहे.

3- पॅनोरामिक सनरूफ

सेल्टोस फेसलिफ्ट कारमध्ये कंपनीकडून पॅनोरामिक सनरूफ देण्यात आले आहे. ग्राहकांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर कंपनीकडून यामध्ये पॅनोरामिक सनरूफ देण्यात आले आहे. आता नवीन सेल्टोस फेसलिफ्ट कारला पॅनोरामिक सनरूफ देखील मिळणार आहे.

4 ट्विन स्क्रीन वक्र डिस्प्ले

ट्विन स्क्रीन वक्र डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले दोन आडव्या स्क्रीनसह येतो. एक इन्फोटेनमेंटसाठी आणि दुसरा इन्स्ट्रुमेंटेशनसाठी दिला जातो. सेल्टोसच्या आतील भागात इंफोटेनमेंट आणि ऑल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी नवीन ड्युअल कनेक्टेड 10.25-इंचाच्या स्क्रीनने सुसज्ज करण्यात आले आहे.

5- ADAS

सेल्टोस फेसलिफ्ट मध्ये कंपनीकडून Advanced Driving Assistance System (ADAS) देखील समाविष्ट केले आहे. या नवीन फीचर्समध्ये ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग, ब्लाइंडस्पॉट डिटेक्शन, स्मार्ट अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, फ्रंट आणि रिअर ट्रॅफिक डिटेक्शन, लेन कीप असिस्ट आणि हाय बीम असिस्ट असे पर्याय देण्यात आले आहेत.

काही इतर वैशिष्ट्ये

सेल्टोस फेसलिफ्टमध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, फ्रंट सीट्समध्ये एसी, बोसची प्रीमियम ऑडिओ सिस्टीम, वायरलेस चार्जिंग, किया कनेक्ट यांसारखी वैशिष्ट्ये वैशिष्ट्ये देण्यात येणार आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना सेल्टोस फेसलिफ्टमध्ये अनेक दमदार वैशिष्ट्ये मिळणार आहेत.