Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

KIA Seltos Price Increased : किआचा ग्राहकांना झटका! लोकप्रिय कारच्या किमतीत केली मोठी वाढ, पहा नवीन किंमत

किआ कार निर्मात्या कंपनीकडून त्यांच्या थोड्याच दिवसांत लोकप्रिय झालेल्या एसयूव्ही कारच्या किमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. कंपनीकडून कारच्या नवीन किमती जाहीर करण्यात आल्या आहेत.

0

KIA Seltos Price Increased : किआ कार उत्पादक कंपनीच्या अनेक कार सध्या भारतीय रस्त्यावर धावताना दिसत आहेत. किआ कारची लोकप्रियता हळूहळू भारतात वाढू लागली आहे. नवनवीन कार सादर करून देशातील ऑटो मार्केटमधील विस्तार वाढवण्यासाठी किआ कार कंपनीकडून अनुकूल पाऊले उचलली जात आहेत.

किआ कार कंपनीने अलीकडेच त्यांची Seltos फेसलिफ्ट कार लाँच केली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र कंपनीकडून या कारच्या किमतीत मोठी वाढ करून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.

किआ seltos कार सर्वात प्रथम २०१९ मध्ये भारतात सादर करण्यात आली आहे. यानंतर या कारची लोकप्रियता वाढत गेली. त्यानंतर कंपनीकडून कारच्या फीचर्स आणि डिझाईनमध्ये बदल करत पुन्हा एकदा जुलै २०२३ मध्ये कारचे फेसलिफ्ट मॉडेल सादर केले आहे.

किआ कार कंपनीने Seltos फेसलिफ्ट कारच्या किमतीत 30 हजार रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना नवीन Seltos कार खरेदी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. कंपनीकडून या कारच्या नवीन किमती जाहीर करण्यात आल्या आहेत.

kia seltos नवीन किंमत

किआने Seltos कारच्या किमतीमध्ये वाढ केल्यानंतर कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10.90 लाख रुपये झाली आहे. या कारच्या टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 20.30 लाख रुपये आहे. कंपनीकडून कारच्या किमतीत करण्यात आलेली वाढ सर्व व्हेरियंटला लागू नाही.

किआ सेल्टोस प्रकार

किआ कार कंपनीने त्यांची Seltos कार HTE, HTK, HTK Plus, HTX, GTX, GTX Plus आणि X Line या व्हेरियंटमध्ये ग्राहकांना ऑफर केली आहे. यापैकी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक व्हेरियंट, GTX Plus आणि X Line व्हेरियंटची अनुक्रमे 30,000 आणि 20,000 रुपयांनी किंमत वाढवली आहे.

अल्पावधीतच कारची क्रेझ वाढली

किआ का कंपनीकडून त्यांच्या Seltos कारचे फेसलिफ्ट मॉडेल या वर्षात सादर केले आहे. या कारला ग्राहकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘मेक इन इंडिया, फॉर द वर्ल्ड’ या दृष्टीकोनासह सादर केलेल्या सेल्टोसने SUV सेगमेंटमध्ये एक गेम चेंजर ठरू शकते.