Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Kia Seltos SUV : किआच्या स्टायलिश SUV ने केली क्रेटाची बत्ती गुल! १० लाखात मिळतात प्रीमियम फीचर्स

किआ कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या नवनवीन कारमध्ये जबरदस्त फीचर्स दिले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

0

Kia Seltos SUV : किआ कार उत्पादक कंपनीकडून देशातील ऑटो विस्तार वाढवण्यासाठी त्यांच्या अनेक नवीन कार सादर केल्या जात आहेत. त्यांच्या या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच आगामी काळात २०२४ मध्ये किआ त्यांच्या नवीन एसयूव्ही कार देखील सादर करणार आहे.

किआ कार निर्मात्या कंपनीच्या Seltos कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. Seltos कारने ऑक्टोबर २०२३ च्या विक्रीमध्ये ह्युंदाई मोटर्सच्या लोकप्रिय क्रेटा कारला टक्कर देत विक्री केली आहे.

 

ऑक्टोबर २०२३ मधील कार विक्री अहवाल सर्वच कार उत्पादक कंपन्यांनी जाहीर केला आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये ह्युंदाई क्रेटा कारच्या 13,077 युनिट्सची विक्री झाली आहे. तर गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२२ मध्ये 11,880 युनिट्सची विक्री झाली होती. तर किआ Seltos कारची ऑक्टोबर २०२३ मध्ये 12,362 युनिट्सची विक्री झाली आहे तर गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२२ मध्ये 9,777 युनिट्सची विक्री झाली होती.

ह्युंदाई क्रेटा कारने ऑक्टोबर २०२३ मध्ये जास्त विक्री केली असली तराई दोन्ही कारच्या विक्रीमध्ये फक्त 695 युनिट्सचा फरक आहे. किआ Seltos कारच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आता लवकरच किआ कार उत्पादक कंपनी त्यांच्या Seltos कारचे फेसलिफ्ट मॉडेल देखील बाजारात लाँच करणार आहे. Seltos फेसलिफ्ट कार चाचणी दरम्यान झाली आहे.

किआ Seltos वैशिष्ट्ये

किआ Seltos एसयूव्ही कारमध्ये 10.25-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट देण्यात आली आहे. तसेच कारमध्ये ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरूफ, हेडअप डिस्प्ले, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, एअर प्युरिफायर, अॅम्बियंट लाइटिंग आणि एलईडी साउंड मूड लाइटिंग इत्यादी वैशिष्ट्ये आहेत. यात सहा एअरबॅग्ज, ESC, TPMS, 360 डिग्री कॅमेरा आणि ADAS अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

किया सेल्टोस किंमत

किआ Seltos कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.90 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 20.30 लाख रुपये आहे. Seltos एसयूव्ही कार 5-सीटर आहे. कारमध्ये तीन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत.

कारमध्ये 1.5-लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे जे 115 PS पॉवर आणि 144 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. 1.5-लीटर डिझेल इंजिन 116 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करते. तर 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन 160 PS पॉवर आणि 253 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि CVT गिअरबॉक्स पर्याय देण्यात आला आहे. टर्बो पेट्रोल इंजिनमध्ये 6-स्पीड IMT आणि 7-स्पीड DCT गिअरबॉक्स देण्यात आलं आहे. तर डिझेल इंजिनमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीडचा पर्याय उपलब्ध आहे.