Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Kia Sonet Facelift : किआची Sonet फेसलिफ्ट SUV या दिवशी होणार लॉन्च! पूर्वीपेक्षा असणार इतकी शक्तिशाली

किआची Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कार लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. या कारमध्ये अनेक बदल केले जाणार असून नवीन इंजिन पर्याय देण्यात आला आहे.

0

Kia Sonet Facelift : किआ कार उत्पादक कंपनीकडून भारतीय ऑटो क्षेत्रातील विस्तार वाढवण्यासाठी त्यांच्या नवनवीन एसयूव्ही कार लॉन्च केल्या जात आहेत. २०२४ मध्ये किआ त्यांची आणखी एक जबरदस्त एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे.

किआ कार निर्मात्या कंपनीकडून त्यांची Sonet Facelift एसयूव्ही कार २०२४ मध्ये लॉन्च केली जाणार आहे. किआकडून त्यांच्या Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारची चाचणी देखील सुरु केली आहे. दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल निर्माता कंपनी किआ सध्या Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारवर काम करत आहे.

किआ कार कंपनी त्यांची Sonet Facelift एसयूव्ही कार 2024 च्या सुरुवातीला लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. नवीन Sonet फेसलिफ्ट कार टाटा नेक्सॉन, ह्युंदाई व्हेन्यू आणि मारुती सुझुकी ब्रेझा एसयूव्ही कारशी स्पर्धा करेल.

एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता किआ कार कंपनी त्यांची नवीन एसयूव्ही जबरदस्त वैशिष्ट्यांसह सादर करणार आहे. एसयूव्ही कार बाजारात मार्केटमध्ये वर्चस्व निर्माण करण्यासाठी किआ त्यांच्या नवीन एसयूव्ही कार सादर करत आहे.

किआ Sonet Facelift ला नवीन डिझाइन मिळण्याची शक्यता

Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारची चाचणी सुरु करण्यात आली असून कारचे डिझाईन बदलल्याचे दिसत आहे. Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कार LED डे टाईम रनिंग लाइट्ससाठी पुन्हा डिझाईन केलेल्या हेडलॅम्प क्लस्टरसह येण्याची शक्यता आहे.

नवीन Sonet एसयूव्हीच्या ग्रिलमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. नवीन एसयूव्ही कार मागील प्रोफाइलमध्ये पुन्हा डिझाइन केलेल्या टेललाइट्स आणि कनेक्टेड LED लाइटबारसह येण्याची शक्यता आहे. तसेच Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारला नवीन अलॉय व्हील्स मिळण्याची शक्यता आहे.

Sonet फेसलिफ्टच्या केबिनमध्ये कॉस्मेटिक बदल होण्याची शक्यता

किआ कार कंपनीकडून त्यांच्या आगामी Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारच्या केबिनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. कारच्या केबिनमध्ये कॉस्मेटिक बदल केले जाणार असल्याची शक्यता आहे. कारमधील टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर अपडेट केले जाऊ शकतात. तसेच ADAS सारखे सुरक्षा वैशिष्ट्ये देखील मिळू शकते.

Sonet फेसलिफ्टच्या मायलेजमध्ये थोडी सुधारणा होईल

नवीन Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारला 1.2-लीटर पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले असू शकते. तसेच कारमध्ये 1.0-लिटर टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन असेल जे 6-स्पीड iMT, 6-स्पीड ऑटोमॅटिक किंवा 7-स्पीड DCT गिअरबॉक्सशी जोडले जाऊ शकते.