Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Kia Sonet Facelift : नेक्सॉनच्या अडचणीत वाढ करण्यासाठी बाजारात आली Sonet फेसलिफ्ट, या लक्झरी फीचर्सने आहे सुसज्ज

0

Kia Sonet Facelift : देशात एसयूव्ही कारच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या नवनवीन एसयूव्ही कार सादर करण्यामध्ये व्यस्त आहेत. अलीकडेच किआने त्यांची Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कार भारतात लॉन्च केली आहे.

किआ Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. कारच्या डिझाईनपासून फीचर्सपर्यंत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. सोनेट फेसलिफ्ट एसयूव्ही कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

किआकडून त्यांच्या Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारचे बुकिंग देखील सुरु करण्यात आले आहे. 25,000 रुपयांच्या टोकन रकमेवर Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कार बुकिंग करू शकता. कारमध्ये अनके कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत.

नवीन डिझाइन ग्रिल, अपडेट केलेले एलईडी डीआरएल, कनेक्ट केलेले एलईडी टेल लॅम्प आणि नवीन अलॉय व्हील्स किआ Sonet फेसलिफ्टमध्ये पाहायला मिळत आहेत.

तसेच कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि प्रगत ड्रायव्हिंग असिस्टन्स टेक्निक (ADAS) सारख्या 25 सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत. 14 डिसेंबर रोजी कंपनीकडून 9 रंग पर्यायासह Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कार सादर करण्यात आली आहे.

किआ Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये 16-इंच स्पोर्टी क्रिस्टल कट अलॉय व्हील्स, पूर्णपणे झाकलेले बॉडी क्लेडिंग, बॉडी कलर डोअर हँडल, रूफ रेल आणि इलेक्ट्रिक सनरूफ असे अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

स्पोर्टी एरोडायनामिक रीअर स्किड प्लेट रिअर स्पॉयलर आणि डार्क मेटॅलिक अॅक्सेंटसह Sonet फेसलिफ्ट सादर करण्यात आली आहे. sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारच्या डॅशबोर्डवर 10.25 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे.

तसेच कारमध्ये 70+ कनेक्टेड कार फीचर्स, एसी फ्रंट सीट्स, 4-वे पॉवर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, 7-स्पीकर बोस ऑडिओ सिस्टम, वायरलेस फोन चार्जिंग, इन-बिल्ट एअर प्युरिफायर, 360-डिग्री कॅमेरा आणि एक इन्फोटेनमेंट टचस्क्रीन अशी मानक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Sonet फेसलिफ्ट इंजिन

Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये 1.2-लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 82 bhp पॉवर आणि 115 Nm टॉर्क जनरेट करते. तसेच कारमध्ये 1-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनचा देखील पर्याय उपलब्ध आहे.

कारमध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन देखील दिले आहे जे 114 bhp पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारचे पेट्रोल इंजिन 18.83 Kmpl आणि डिझेल इंजिन 22.3 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.